IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी कमाल केल्यानंतर GTच्या सलामीवीरांनी मजबूत पाया सेट केला अन् RRला सहज हरवले. कर्णधार हार्दिक पांड्या आज जरा घाईत दिसला अन् त्याने अॅडम झम्पाच्या एका षटकात २४ धावा कुटल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे धाडस राजस्थान रॉयल्सच्या अंगलट आले. राशीद खान ( ४-०-१४-३) व नूर अहमद या फिरकीपटूंनी त्यांना नाचवले. यशस्वी जैस्वाल ( १४) व संजू सॅमसन ( ३०) यांची जोडी चांगली खेळत होती, परंतु ताळमेळ चुकल्याने यशस्वी रन आऊट झाला अन् गुजरात टायटन्सने सामन्यावर पकड घेण्यास सुरूवात केली. जॉस बटलर ( ८), आर अश्विन ( २), रियान पराग ( ४), ध्रुव जुरेल ( ९), शिमरोन हेटमायर( ७) यांना दुहेरी धावा करता आल्या नाही. ट्रेंट बोल्टने महत्त्वाच्या १५ धावा केल्या अन् शमीने त्याचा त्रिफळा उडवला. RRचा डाव ११८ धावांवर संपुष्टात आला.
शुबमन गिल आणि वृद्घीमान साहा यांनी सहजेतेन धावा केल्या. संजूचे सर्व डावपेच आज या दोघांनी अपयशी ठरवले. या दोघांची चांगले फटकेबाजी करताना ट्रेंट बोल्टसह RRच्या जलदगती गोलंदाजांना अपयशी केले. पॉवर प्लेनंतर संजूने फिरकीपटूंना आणले. एकीकडे GTच्या फिरकीपटूंनी कमाल केलेली असताना संजूने फिरकीपटूंना आणण्यात विलंब लावला. त्यामुळे गिल व साहा यांना पाय रोवून खेळता आले. १०व्या षटकात अखेर युझवेंद्र चहलने ७१ धावांवर ही भागीदारी तोडली. शुबमन ३६ धावांवर स्टम्पिंग झाला. हार्दिक पांड्याने ११व्या षटकात ६,४,६,६ अशा धावा कुटल्या अन् मॅच GTच्या पारड्यात पूर्णपणे झुकवली.
गुजरातने १२व्या षटकांत शतकी वेस ओलांडली अन् त्यांना उर्वरित चेंडूंत २० धावा करायच्या होत्या. हार्दिक व साहा या जोडीने हे लक्ष्य सहज पार करताना गुजरातला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. गुजरातने १४ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. हार्दिकने १५ चेंडूंत ३९ धावा केल्या, तर साहा ४१ धावांवर नाबाद राहिला. गुजरातने १३.५ षटकांत सामना जिंकला.
Web Title: IPL 2023, RR vs GT Live Marathi : Hardik Pandya smashed 6, 4, 6, 6, 1 against Zampa, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 9 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.