IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:06 PM2023-05-05T21:06:57+5:302023-05-05T21:11:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RR vs GT Live Marathi : Rashid Khan ( 4-0-14-3), Noor Ahmad ( ३-०-२५-२) shine for Gujarat Titans, Rajasthan Royals all out on 118 runs. | IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने शरणागती पत्करली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांसमोर RRचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाही. संजू सॅमसनच्या चूकीच्या कॉलमुळे यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला अन् त्यानंतर GT ने पकड घेतली. RRचे फलंदाज एकामागोमाग माघारी परतले. राशीद खान ( ४-०-१४-३) व नूर अहमद या फिरकीपटूंनी त्यांना नाचवले.  

चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video

RR ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉस बटलरची ( ८) बॅट त्याच्यावर रुसल्याचे आजही दिसले.. हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकात त्याची विकेट घेतली. मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जैस्वालने त्याचे दडपण येऊ दिले नाही आणि तो चांगली फटकेबाजी करत होता. त्याने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६ (२१) धावांची भागीदारी केली होती. पण, सहाव्या षटकात दोघांमधील ताळमेळ चुकले अन् अभिनव मनोहरच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे यशस्वीला ( १४) रन आऊट होऊन माघारी जावे लागले. ( पाहा विकेट )   जोशूआ लिटलच्या गोलंदाजीवर संजूचा फटका चूकला अन् २० चेंडूंत ३० धावांवर तो माघारी परतला. 


आर अश्विनला ( २) फलंदाजीसाठी आघाडीवर पाठवले, परंतु राशीद खानने त्याचा त्रिफळा उडवला. रियान परागला आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती, परंतु राशीदने त्याला ( ४) पायचीत केले. RRचा निम्मा संघ ६९ धावांवर माघारी परतला. देवदत्त पडिक्कलकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु तोही १२ धावांवर नूर अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. नूरने आणखी एक धक्का देताना ध्रुव जुरेलची ( ९) विकेट मिळवून दिली.  देवदत्त व ध्रुव यांनी DRS गमावले आणि राशीदने RRचा शेवटचा फलंदाज शिमरोन हेटमायरला ( ७) पायचीत केले. ट्रेंट बोल्टने महत्त्वाच्या १५ धावा केल्या अन् शमीने त्याचा त्रिफळा उडवला. 

१८व्या षटकात मोहित शर्माला गोलंदाजीला आणले, परंतु तोपर्यंत गुजरातच्या अन्य गोलंदाजांनी मोहिम फत्ते केली होती. RRचा डाव ११८ धावांवर संपुष्टात आला. 

 

Web Title: IPL 2023, RR vs GT Live Marathi : Rashid Khan ( 4-0-14-3), Noor Ahmad ( ३-०-२५-२) shine for Gujarat Titans, Rajasthan Royals all out on 118 runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.