Join us  

IPL 2023, RR vs LSG Live : २२ धावांत ४ फलंदाज गमावले! KL Rahulच्या संघाचे 'ग्रह' अचानक फिरले, राजस्थानने वर्चस्व राखले

IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : लोकेश राहुल आणि कायल मायर्स यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 9:10 PM

Open in App

IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : लोकेश राहुल आणि कायल मायर्स यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. राजस्थान रॉयल्सने लोकेशसह ४ फलंदाजांना २२ धावांत माघारी पाठवून सामन्यावर पकड घेतली. RRच्या गोलंदाजांनी आज टिच्चून मारा केला अन् LSGला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. ट्रेंट बोल्ट व आर अश्विन यांनी बहारदार गोलंदाजी केली. निकोलस पूरन व मार्कस स्टॉयनिस यांनी शेवटच्या दोन षटकांत काही चांगले फटके मारून LSGच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली. 

'लेडी लक' मैदानावर आली, KL Rahulची फलंदाजी बहरली; RRने दिले दोन जीवदान,पण...

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, सुरुवातीच्या काही षटकांत RRच्या क्षेत्ररक्षकांनी LSGचा कर्णधार लोकेश राहुल याचे दोन सोपे झेल टाकले. RRच्या गोलंदाजांनी धावगती रोखली होती, परंतु विकेट मिळाली असती तर त्यांची पकड अधिक मजबूत झाली असती. सेट झालेल्या राहुल व कायल मायर्स या जोडीने हळुहळू हात मोकळे केले.  लोकेश चांगली फटकेबाजी करत होता अन् धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. ११व्या  षटकात जेसन होल्डरने यश मिळवून दिले. लोकेश ३२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३९ धावांवर झेलबाद झाला. 

RRचा कर्णधार संजू सॅमसनने लगेच ट्रेट बोल्टला पुन्हा गोलंदाजीवर आणले अन् त्याने आयुष बदोनीचा ( १) त्रिफळा उडवून RRला दुसरे यश मिळवून दिले.  बोल्टने ४-१-१६-१ असा स्पेल टाकला. पण, मायर्स वेगळ्याच मूडमध्ये होता आणि त्याने ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दीपक हुडाने ( २) पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला अन् अश्विनच्या गोलंदाजीवर मारलेला उत्तुंग चेंडू हेटमायरने अप्रतिमरित्या टिपला. अश्विनने त्याच षटकात LSGला मोठा धक्का दिला. ४२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार मारून ५१ धावा करणाऱ्या मायर्सचा त्याने त्रिफळा उडवला. चहलने ४ षटकांत सर्वाधिक ४१ धावा दिल्या. 

RRच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हरमध्ये ( भैरवीच्या षटकांत) चांगला मारा केला. मार्कस स्टॉयनिस व निकोलस पूरन हे बिग हिटर फलंदाज मैदानावर असूनही LSGला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अश्विनने २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. १९व्या षटकात पूरनने ६,४,०,४,१ अशी फटकेबाजी केली. होल्डरच्या त्या षटकात १७ धावा आल्या. संदीप शर्माने २०व्या षटकात स्लोव्हर बाऊन्सवर स्टॉयनिसला ( २१) बाद केले. पाचव्या षटकात निकोलसला ( २९) संजूने अचूक थ्रो करून रन आऊट केले. LSG च्या ७ बाद १५४ धावा झाल्या.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्स
Open in App