IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : लोकेश राहुल आणि कायल मायर्स यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली आहे. आयपीएल २०२३ मधील त्यांनी आतापर्यंतची पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. राजस्थान रॉयल्सच्या क्षेत्ररक्षकांनी दोन सोपे झेल सोडून KL Rahul ला जीवदान दिले. आजचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ( Athiya Shetty) आली होती आणि तिच्यासमोर आज लोकेश मोठी खेळी करेल असे वाटत होते. पण...
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध घरच्या मैदानावर RR ४ वर्षांनंतर खेळत आहेत. ट्रेंट बोल्ट व लोकेश राहुल यांची पहिल्याच षटकात जुगलबंदी पाहायला मिळाली. लोकेशने सावध पवित्रा घेतला अन् बोल्टचे ते षटक निर्धाव राहिले. LSGविरुद्ध पहिले षटक निर्धाव टाकणारा बोल्ट पहिलाच गोलंदाज ठरला. संदीप शर्माच्या दुसऱ्या षटकात मात्र कायल मायर्स व लोकेशने १२ धावा काढल्या. चौथ्या षटकात संदीपच्या पहिल्याच चेंडूवर लोकेशने कव्हर ड्राईव्ह मारला अन् यशस्वी जैस्वालला झेल घेण्याची संधी मिळालेली, परंतु तो चुकला. पुढच्याच षटकात बोल्टच्या गोलंदाजीवर लोकेशने उत्तुंग फटका मारला अन् जेसन होल्डरचा परतीचा झेल घेण्याचा प्रयत्न फसला. १२ धावांवर पुन्हा लोकेशला जीवदान मिळाले.
RRच्या गोलंदाजांकडून चांगला मारा होताना दिसला अन् त्यांनी LSGच्या धावसंख्या रोखून ठेवली होती. पण, सेट झालेल्या या जोडीने हळुहळू हात मोकळे करण्यास सुरुवात केली. जेसन होल्डर आणि युझवेंद्र चहल यांच्या षटकात दोघांनी अनुक्रमे १३ व १८ धावा चोपल्या. लोकेश चांगली फटकेबाजी करत होता अन् धावांचा वेग वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ११व्या षटकात जेसन होल्डरने यश मिळवून दिले. लोकेश ३२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३९ धावांवर झेलबाद झाला. LSG ला ८३ धावांवर पहिला धक्का बसला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, RR vs LSG Live Marathi :lady luck Athiya Shetty in the stands, KL Rahul has been dropped twice, but he is out on 39 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.