Join us  

IPL 2023, RR vs LSG Live : राजस्थान रॉयल्सने हातची मॅच गमावली; KL Rahulच्या संघाला विजयाची भेट दिली  

IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live :  राजस्थान रॉयल्सने कमी लक्ष्य आहे, म्हणून लखनौ सुपर जायंट्सला गृहित धरले आणि तेच महागात पडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:18 PM

Open in App

IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live :  राजस्थान रॉयल्सने कमी लक्ष्य आहे, म्हणून लखनौ सुपर जायंट्सला गृहित धरले. यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर हे सलामीवीर १० षटकं खेळले, परंतु त्यांनीही सामना खूपच हलक्यात घेतला होता. त्यामुळे १५६ धावांचा पाठलाग करताना RRला संघर्ष करायला लावला. देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग यांनी अखेरच्या षटकांत फटके मारले, परंतु त्याला उशीर झाला होता. देवदत्त अखेरच्या षटकात बाद झाला अन् RR ने हातचा सामना गमावला.

पॉवर प्लेमध्ये याला खेळताना पाहणे ही ...! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून KL Rahulचे ऑन एअर वाभाडे

लोकेश राहुल ( ३९) आणि कायल मायर्स ( ५१) यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली होती,  परंतु 0 राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी कमबॅक केला.RRच्या गोलंदाजांनी आज टिच्चून मारा केला अन् LSGला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. ट्रेंट बोल्ट व आर अश्विन यांनी बहारदार गोलंदाजी केली. लोकेशला दोन जीवदान मिळाले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो ३२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३९ धावांवर झेलबाद झाला. बोल्टने ४-१-१६-१ असा स्पेल टाकला. मायर्सने ४२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार मारून ५१ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिस व निकोलस पूरन हे बिग हिटर फलंदाज मैदानावर असूनही LSGला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अश्विनने २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. लखनौला ७ बाद १५४ धावाच करता आल्या.

यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर यांनी सावध सुरूवात करताना LSGचं टेंशन वाढवले होते. बटलरने ११२ मीटर लांब षटकार खेचला. आयपीएल २०२३ मधील हा सर्वात लांब षटकार ठरला. फॅफ ड्यू प्लेसिसने ११५ मीटर लांब षटकार खेचला आहे. RR ने पॉवर प्लेमध्ये ४७ धावा जोडल्या. ही जोडी संयमाने RRच्या खात्यात धावा जोडताना दिसली आणि त्यांनी १० षटकांत ७३ धावा केल्या. या दोघांची भागीदारी ८७ धावांवर तुटली. मार्कस स्टॉयनिसने RRला पहिला धक्का देताना यशस्वीला ( ४४) बाद केले. संजू सॅमसनला ( २) अती घाई महागात पडली अन् तो रन आऊट झाला. स्टॉयनिसने RRचा आणखी एक सेट फलंदाज बटलरला ( ४०) माघारी पाठवले. १० धावांत RR चे तीन मोठे फलंदाज माघारी परतले. 

LSGच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला अन् त्यांनीही टिच्चून मारा सुरू केला. RR ला ३० चेंडूंत ५१ धावांची गरज होती आणि शिमरोन हेटमायर व देवदत्त पडिक्कल ( इम्पॅक्ट प्लेअर) ही जोडी मैदानावर उभी होती. १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आवेश खानने RRचा मॅच फिनिशर हेटमायरला ( २) बाद केले. लोकेशने चांगला झेल घेतला. RRला ३२ चेंडूनंतर चौकार मिळाला. १८ चेंडू ४२ धावा असा सामना हळुहळू राजस्थानच्या हातून निसटताना दिसला. देवदत्तने १८व्या षटकात १३ धावा काढून थोडा आशेचा किरण दाखवला. स्टॉयनिसने २८ धावांत २ विकेट्स घेतल्या.

रियान परागने १९व्या षटकात षटकार खेचून १० धावा काढल्या. ६ चेंडू १९ धावा असा सामना आला. रियानने पहिलाच चेंडू चौकार खेचला. देवदत्त ( २६) आणि ध्रुव जुरेल ( ०) यांना आवेश खानने सलग चेंडूंवर बाद केले. दीपक हुडाने सीमारेषेच्या अगदी नजिक जुरेलचा झेल घेतला. RRला २ चेंडूंत १४ धावा हव्या होत्या आणि ते अशक्यच होतं. आवेशची हॅटट्रिक हुकली, परंतु त्याने LSGला मॅच जिंकून दिली. राजस्थानला ६ बाद १४४ धावा करता आल्या आणि लखनौने १० धावांनी सामना जिंकला. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्स
Open in App