IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने धावांचा डोंगर उभा केला. शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थान रॉयल्ससाठ अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला. अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच RRला धक्के दिले आणि त्यानंतर नॅथन एलिसने संजू सॅमसनच्या संघाला गोंधळात टाकले. PBKS ने रोमहर्षक विजय मिळवला. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवरील पहिल्याच आयपीएल सामन्याला प्रेक्षकांनीही चांगली उपस्थिती लावली होती.
बॅट, पॅड, कॅच.. OUT! जॉस बटलर विचित्र पद्धतीने झाला बाद, अश्विन १० वर्षानंतर बनला ओपनर, Video
जॉस बटलर सलामीला येणे अपेक्षित होते, परंतु त्याला दुखपत झाली आणि RR ने ओपनिंगला यशस्वी जैस्वालसह आर अश्विनला पाठवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अर्शदीप सिंगने राजस्थानला धक्के दिले. यशस्वी ( ११) आणि अश्विन ( ०) यांना त्याने माघारी पाठवले. नॅथन एलिसच्या गोलंदाजीर बटलर ( १९) बाद झाला. चेंडू बटलरच्या बॅटला लागून पॅडवर आदळला अन् हवेत उडाला. एलिसने चतुराई दाखवून सुरेख झेल टिपला. कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांनी संयमी खेळ करताना RR ची पडझड थांबवली होती. पण, एलिसने ही जोडी तोडली आणि २५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ४५ धावा करणारा संजू झेलबाद झाला.
'लोकल बॉय' रियान परागन आल्या आल्या दोन षटकार खेचून प्रेक्षकांमध्ये जोश भरला, परंतु १२ चेंडूंत २० धावा करणाऱ्या रियानला PBKSच्या एलिसने बाद केला. ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एलिसने RR कर्णधार संजू सॅमनला बाद केले होते आणि त्यानंतर पुढील षटकाच्या पहिल्या चेंडूवर रियानची विकेट घेतली. त्याला हॅटट्रिकची संधी होती, परंतु शिमरोन हेटमायरने यश मिळवू दिले नाही. पण, अखेरच्या चेंडूवर देवदत्तचा ( २१) त्रिफळा उडवला. RR ला ३० चेंडूंत ७४ धावा करायच्या होत्या. शिमरोन हेटमायरला उशीर सूर गवसला आणि तोपर्यंत RRच्या हातून सामना निसटला होता. एलिसने ३० धावांत ४ विकेट्स घेतल्या. हेटमारयरने उत्तुंग फटके मारताना १२ चेंडूंत ३४ धावा असा सामना चुरशीचा बनवला. ध्रुव जुरेलने दुसऱ्या बाजूने फटके खेचले.
हेटमायर आणि जुरेल यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अर्शदीपच्या १९व्या षटकात जुरेलने ४,६,४ अशा धावा कुटल्या आणि अखेरच्या चेंडूवर हेटमायरचा झेल टाकला. १९व्या षटकात १८ धावा आल्या आणि राजस्थानला ६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात हेटमायर रन आऊट झाला. हेटमायरने १८ चेंडूंत ३६ धावा केल्या. RRला ३ चेंडूंत १२ धावांची गरज होती आणि जुरेलवर सर्व भीस्त होती. २ चेंडू ११ धावा असताना जेसन होल्डर स्ट्राईकवर होता अन् होल्डरने १ धाव घेतली. शेवटी चौकार लगावर राजस्थानने ७ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली अन् पंजाबने ५ धावांनी मॅच जिंकली. जुरेल १५ चेंडूंत३२ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) आक्रमक खेळी केली आणि त्यानंतर कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानेही वादळी फटकेबाजी केली. प्रभसिमरनने ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या आणि धवनसह पहिल्या विकेटसाठई ९१ धावा जोडल्या. भानुका राजपक्षाला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. धवनला जितेश शर्माची( २७) चांगली साथ मिळाली आणि दोघांनी ३३ चेंडूंत ६० धावा जोडल्या. धवनने ५६ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या. पंजाबने ४ बाद १९७ धावा केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"