IPL 2023, RR vs PBKS Live : ९ चौकार, ३ षटकार! शिखर धवन शतक होता होता राहिले; प्रभसिमरन सिंगनेही RRला धू धू धुतले

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:32 PM2023-04-05T21:32:13+5:302023-04-05T21:33:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RR vs PBKS Live : Prabhsimran Singh 60(34) & Shikhar Dhawan finished on 86*(56), Punjab Kings to post 197 for 4 from 20 overs | IPL 2023, RR vs PBKS Live : ९ चौकार, ३ षटकार! शिखर धवन शतक होता होता राहिले; प्रभसिमरन सिंगनेही RRला धू धू धुतले

IPL 2023, RR vs PBKS Live : ९ चौकार, ३ षटकार! शिखर धवन शतक होता होता राहिले; प्रभसिमरन सिंगनेही RRला धू धू धुतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.  प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) आक्रमक खेळी केली आणि त्यानंतर कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानेही वादळी फटकेबाजी केली. धवनचे शतक पूर्ण होता होता राहिले.

हद्दीत राहा, नाहीतर...! आर अश्विनची Live Match शिखर धवनला वॉर्निंग अन् कॅमेरामनले लावले भांडण

प्रभसिमरनने अनपेक्षित खेळी करताना ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. जेसन होल्डरने RRला पहिली विकेट मिळवून दिली. जॉस बटलरने अफलातून झेल टिपला.त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षाला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखरने मारलेला जोरात फटका नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या राजपक्षाच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला. विराट कोहली व डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर आयपीएलमध्ये ५०वेळा ५०+ धावा करणारा धवन हा तिसरा फलंदाज ठरला. धवनला विदर्भाच्या जितेश शर्माची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी ३३ चेंडूंत ६० धावा जोडल्या. जितेश १६ चेंडूंत २७ धावांवर बाद झाला. 

सिकंदर रझाला ( १) अश्विनने चकवले अन् त्याचा त्रिफळा उडवला. धवन एका बाजूने चांगली खेळी करताना दिसला. धवनने २०७ डावांत आयपीएलमध्ये पन्नासवेळा ५० + धावा केल्या आणि विराटचा ( २१६ डाव) विक्रम मोडला. धवनने चांगले रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीप फटके मारले. धवनने ५६ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या. होल्डरने दुसरी विकेट घेताना शाहरुख खानला ( ११) बाद केले. पुन्हा एकदा बटलरने सुरेख झेल टिपला. पंजाबने 4 बाद 197 धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, RR vs PBKS Live : Prabhsimran Singh 60(34) & Shikhar Dhawan finished on 86*(56), Punjab Kings to post 197 for 4 from 20 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.