Join us  

IPL 2023, RR vs PBKS Live : हद्दीत राहा, नाहीतर...! आर अश्विनची Live Match शिखर धवनला वॉर्निंग अन् कॅमेरामनने लावले भांडण, Video 

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 8:56 PM

Open in App

IPL 2023, Rajasthan Royals vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. राजस्थान रॉयलन्सने या स्टेडियमची दुसरे होम ग्राऊंड म्हणून निवड केली आहे आणि त्यांच्याच घरी PBKS ने फटकेबाजी केली. प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) आक्रमक खेळी केली आणि त्यानंतर कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानेही अर्धशतक झळकावले. दरम्यान, आर अश्विनने ( R Ashwin) लाईव्ह मॅचमध्ये गब्बरला वॉर्निंग दिली.  

प्रभसिमरन सिंगची वादळी खेळी! शिखर धवनने स्वतःच्याच फलंदाजाला केले रिटायर्ड हर्ट

राजस्थान रॉयल्स ज्या फलंदाजाचा अभ्यास करून मैदानावर आले नव्हते त्या प्रभसिमरनने अनपेक्षित खेळी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तत्पूर्वी, आर अश्विनने मंकडिंगची वॉर्निंग दिली. नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेला धवन क्रिज सोडून फारच पुढे निघून गेला होता आणि अश्विनने हे पाहिले व चेंडू टाकण्यापूर्वी तो थांबला व वळला. गब्बर तातडीने माघारी परतला अन् अश्विनने वॉर्निंग दिली. दरम्यान कॅमेरामनने त्वरित कॅमेरा जॉस बटलरकडे वळवला. २०१९च्या आयपीएलमध्ये अश्विन व बटलर यांच्यात मंकडिंगवरून खूप मोठा वाद झाला होता. 

 जेसन होल्डरने RRला पहिली विकेट मिळवून दिली. प्रभसिमरन ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांवर बाद झाला. जॉस बटलरने अफलातून झेल टिपला. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षाला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखरने मारलेला जोरात फटका नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या राजपक्षाच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला अन् त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. धवननेही अर्धशतक पूर्ण करताना पंजाबला १५ षटकांत १ बाद १५१ धावांवर पोहोचवले. विराट कोहली व डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर आयपीएलमध्ये ५०वेळा ५०+ धावा करणारा धवन हा तिसरा फलंदाज ठरला. ( Shikhar Dhawan becomes the third player after Warner & Kohli to complete 50 "Fifty plus" score in IPL.) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३पंजाब किंग्सशिखर धवनआर अश्विनराजस्थान रॉयल्स
Open in App