IPL 2023, RR vs RCB : मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली

IPL 2023, RR vs RCB :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील आशांना मोठं बळ मिळालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 04:44 PM2023-05-15T16:44:27+5:302023-05-15T16:45:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, RR vs RCB : If I had bowled, they would have been all out for 40 -Virat Kohli's epic dig at RR as RCB dressing room celebrates 112-run win, Video | IPL 2023, RR vs RCB : मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली

IPL 2023, RR vs RCB : मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत All Out झाले असते - विराट कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, RR vs RCB :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील आशांना मोठं बळ मिळालं आहे. रविवारी त्यांनी राजस्थान रॉयल्सवर ११२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. RCB ने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात RRचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांवर तंबूत परतला. या निकालासोबत RCB ने केवळ दोन गुण कमावले नाही, तर नेट रन रेटमध्येही मोठी उसळी घेतली. कालच्या लढतीपूर्वी गुजरात टायटन्सनंतर RRचा नेट रन रेट चांगला होता, परंतु तो आता ०.१४० असा झाला आहे. तेच RCB ०.१७० असा झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी पाचव्या क्रमांकावर झेप घेतलीय.

या विजयानंतर RCBच्या ड्रेसिंग रुममध्ये चांगलाच जल्लोष झाल, परंतु विराट कोहलीच्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. विराटने मस्करीत म्हटले की जर मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत ऑल आऊट झाला असता.  "जर मी गोलंदाजी केली असती तर ते ४० धावांवर ऑल आऊट झाले असते," असे कोहली आरसीबीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय. 



कोहलीने त्याच्या कारकिर्दीत क्वचितच गोलंदाजी केली आहे आणि त्याने स्वत: त्याच्या गोलंदाजीबद्दल अनेक विनोद केले आहेत. २० षटकांच्या सामन्यासाठी RR चे ५९ धावांवर ऑल आउट होणे,  हा IPL मधील आतापर्यंतचा तिसरा सर्वात कमी स्कोअर आहे. २००९ च्या मोसमात RCB विरुद्ध RR कडून दुसऱ्या-निचांक ५८ धावा झाल्या होत्या, तर २०१७ मध्ये RCB ने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सर्वात कमी ४९ धावा केल्या होत्या.  

आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या

CSKची संधी ३८ टक्क्यांवर आली; KKRसह १२ गुण असलेल्या ४ संघांत शर्यत लागली

CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई

पहिला चेंडू पडताच चेन्नईचा पराभव दिसला...?; MS धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...!

वेन पार्नेल रविवारी RCB साठी स्टार ठरला, त्याने १० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या विकेट्समध्ये जोस बटलर,  संजू सॅमसन आणि जो रूट यांचा समावेश होता. "दोन गुण मिळवून आणि एवढ्या मोठ्या फरकाने जिंकल्याबद्दल खूप आनंद झाला, मला वाटते की गुणतालिका खूप गजबजलेली आहे आणि निव्वळ धावगती आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करायची आहे,” पार्नेलने सांगितले.

Web Title: IPL 2023, RR vs RCB : If I had bowled, they would have been all out for 40 -Virat Kohli's epic dig at RR as RCB dressing room celebrates 112-run win, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.