IPL 2023, RR vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमधील आशांना मोठं बळ मिळालं आहे. रविवारी त्यांनी राजस्थान रॉयल्सवर ११२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. RCB ने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७१ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात RRचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांवर तंबूत परतला. या निकालासोबत RCB ने केवळ दोन गुण कमावले नाही, तर नेट रन रेटमध्येही मोठी उसळी घेतली. कालच्या लढतीपूर्वी गुजरात टायटन्सनंतर RRचा नेट रन रेट चांगला होता, परंतु तो आता ०.१४० असा झाला आहे. तेच RCB ०.१७० असा झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी पाचव्या क्रमांकावर झेप घेतलीय.
या विजयानंतर RCBच्या ड्रेसिंग रुममध्ये चांगलाच जल्लोष झाल, परंतु विराट कोहलीच्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. विराटने मस्करीत म्हटले की जर मी गोलंदाजी केली असती, तर RR ४० धावांत ऑल आऊट झाला असता. "जर मी गोलंदाजी केली असती तर ते ४० धावांवर ऑल आऊट झाले असते," असे कोहली आरसीबीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय.
आयपीएलच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या
CSKची संधी ३८ टक्क्यांवर आली; KKRसह १२ गुण असलेल्या ४ संघांत शर्यत लागली
CSK ला हरवणे महागात पडले; KKRचा कर्णधार नितीश राणावर कारवाई
पहिला चेंडू पडताच चेन्नईचा पराभव दिसला...?; MS धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...!
वेन पार्नेल रविवारी RCB साठी स्टार ठरला, त्याने १० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या विकेट्समध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि जो रूट यांचा समावेश होता. "दोन गुण मिळवून आणि एवढ्या मोठ्या फरकाने जिंकल्याबद्दल खूप आनंद झाला, मला वाटते की गुणतालिका खूप गजबजलेली आहे आणि निव्वळ धावगती आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करायची आहे,” पार्नेलने सांगितले.