IPL 2023, Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Live Marathi : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील प्ले ऑफच्या मार्गात स्वतःच्या हाताने खड्डा खणून घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RRचे ७ फलंदाज ५० धावातच तंबूत परतले होते. चुकीच्या फटक्यांनी RRचा घात केला. वेन पार्नेल व मायकेल ब्रेसवेल यांनी RCBला हे यश मिळवून दिलं. या पराभवामुळे RRचे १३ सामन्यांत १२ गुण राहिले आहेत, तर RCB ने १२ सामन्यांत १२ गुण कमावत Point Table मध्ये झेप घेतली. आता Play Offs ची शर्यत आणखी चुरशीची झाली. नेट रन रेट सुधारत RCB ने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी स्वतःहून विकेट फेकल्या. यशस्वी जैस्वाल ( ०), संजू सॅमसन ( ४), जोस बटलर ( ०) हे चुकीचे फटके मारून बाद झाले. आयपीएल इतिहासात दोन्ही ओपनर शून्यावर बाद होण्याची ही ११वी वेळ आहे. इम्पॅक्ट प्लेअर देवदत्त पडिक्कल आणि जो रूट यांच्याकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु मायकेल ब्रेसवेलने त्याच्या पहिल्या षटकात पडिक्कलला ( ४) बाद केले. वेन पार्नेलने सुरुवातीचे तीन फलंदाज माघारी पाठवले, त्याने जो रूटला ( १०) पायचीत करून RRची अवस्था ५ बाद २८ अशी केली. ( पाहा RR च्या तीन विकेट्स )
ब्रेसवेलने त्याच्या पुढच्या षटकात ध्रुव जुरेलला ( १) चूक करण्यास भाग पाडले. शिमरोन हेटमायरने तीन षटकार खेचून RR वरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात आर अश्विन (०) रन आऊट झाला. RRला ५० धावांत सातवा धक्का बसला. शिमरोन हेटमायर १९ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ३५ धावांवर मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. झम्पाही ( २) कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. राजस्थानचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांत तंबूत परतला अन् RCB ने ११२ धावांनी सामना जिंकला.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'
चेन्नई सुपर किंग्स आज हरल्यास, काय होईल? KKR जिंकूनही CSK ठरणार 'बाजीगर'!
Out or not out ? देवदत्त पडिक्कलची वादग्रस्त विकेट? RR ६ बाद ३१ धावा, Video
तत्पूर्वी, फॅफ ड्यू प्लेसिस ( ५५) आणि ग्लेन मॅक्सवेल ( ५४) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर RCB ने ५ बाद १७१ धावा केल्या. विराट कोहलीसह ( १८) केएम आसीफने RCBच्या दोन्ही सलामीवीरांची विकेट घेतली. अॅडम झम्पाने एकाच षटकात महिपाल लोम्रोर ( १) व दिनेश कार्तिक ( ०) यांची विकेट घेतली. फॅफ व विराट यांनी ५०, तर फॅफ व मॅक्सवेल यांनी ६९ धावांची भागीदारी केली. अनुज रावतने ११ चेंडूंत नाबाद २९ धावा चोपल्या.
Web Title: IPL 2023, RR vs RCB Live Marathi : Royal Challengers Bangalore won by 112 runs, Rajasthan Royals 59 all out (10.3 target: 172) RCB's comeback in the race for the Play Offs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.