Jos Buttler Sanju Samson, IPL 2023 RR vs SRH: राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. जॉस बटलर आणि संजू सॅमसन जोडीच्या भागीदारीच्या जोरावर राजस्थानने २० षटकात २ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली. सवाई मानसिंग स्टेडियमवर टी२० सामन्यात झालेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. जॉस बटलरचं शतक थोडक्यात हुकलं. त्याने ५९ चेंडूत ९५ धावा केल्या. तर संजू सॅमसनने शेवटपर्यंत नाबाद राहत ६६ धावा केल्या.
राजस्थानच्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवला. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल मैदानात उतरताच गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने १८ चेंडूत ३५ धावा केल्या. कट शॉटच्या नादात तो झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर संजू आणि बटलर यांनी दमदार भागीदारी केली. ५४ धावांवर जैस्वाल बाद झाल्यावर संजू सॅमसन आणि जॉस बटलरने संघाला १९४ धावापर्यंत नेले. बटलरने ३२ चेंडूत अर्धशतक केले. त्यानंतर त्याची शतकाकडे वाटचाल सुरू होती. पण भुवनेश्वर कुमारने त्याला पायचीत केले. बटलरने १० चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ५९ चेंडूत ९५ धावा केल्या.
--
बटलर बाद झाल्यावर संजू सॅमसनने फटकेबाजी सुरू ठेवली. संजूने आपले अर्धशतक पूर्ण केलेच. त्यासोबतच त्याने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने २० षटकात २१४ धावा केल्या. सवाई मानसिंग स्टेडियम वरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी टी२० धावसंख्या ठरली. संजूने ३८ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. त्यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार लगावले.
Web Title: IPL 2023 RR vs SRH Live Jos Buttler misses century but shines with Sanju Samson in Batting Rajasthan Royals highest score at stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.