Join us

IPL 2023 : सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन 

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 18:40 IST

Open in App

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. दिल्लीच्या १६३ धावांच्या लक्ष्याचा गुजरातने ४ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला आणि आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यावर GTचा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman gill) याने भारी रिअॅक्शन दिली आहे. एक क्रिकेट चाहता २० हजार रुपयांचं प्रीमियम तिकीट खरेदी करून मॅच पाहायला आला आणि त्याला मिळालेली रॉयल ट्रिटमेंट पाहून गिल अवाक् झाला...  

आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यातील हा व्हिडीओ आहे आणि जो सामना गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. गुजरात टायटन्सने माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला होता. हा सामना पाहण्यासाठी चाहत्याने चक्क २० हजार रुपयांचं तिकीट खरेदी करून स्टेडियमवर आला. त्याने त्या अनुभवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला.  

या चाहत्याला घेण्यासाठी इलेक्ट्रीक कार्ट आली होती आणि त्यावर बसून चाहत्याला लाऊंजवर नेण्यात आले. त्याला बालकनीमध्ये जाण्याचीही परवानगी दिली गेली.  हे सर्व पाहून शुबमन गिलने लिहिले की, सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! ( मस्तच आहे भावा... आम्हाला तर चालत जावं लागलं.)   

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३शुभमन गिलनरेंद्र मोदी स्टेडियमऑफ द फिल्ड
Open in App