No Ball, IPL 2023: "सगळे नियम गोलंदाजांना, मग 'त्या' फलंदाजांचे काय जे...." माजी भारतीय क्रिकेटपटूचा संताप

Sandeep Sharma No Ball, IPL 2023: राजस्थान वि. हैदराबाद सामन्यात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 02:29 PM2023-05-09T14:29:30+5:302023-05-09T14:30:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Sandeep Sharma No ball controversy former Indian Murali Kartik cricketer says bowler has rules what about what about non strikers | No Ball, IPL 2023: "सगळे नियम गोलंदाजांना, मग 'त्या' फलंदाजांचे काय जे...." माजी भारतीय क्रिकेटपटूचा संताप

No Ball, IPL 2023: "सगळे नियम गोलंदाजांना, मग 'त्या' फलंदाजांचे काय जे...." माजी भारतीय क्रिकेटपटूचा संताप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sandeep Sharma No Ball, IPL 2023: सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेलेला सामना या मोसमातील आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर २१५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. हैदराबादने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून या लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र, शेवटच्या चेंडूवर सनरायझर्सला ५ धावांची गरज असताना, अब्दुल समद षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि राजस्थानने 4 धावांनी सामना जिंकल्याचे दिसले. पण राजस्थानसाठी शेवटचे षटक टाकणाऱ्या संदीप शर्माने तो नो बॉल टाकला, त्यामुळे हैदराबादला आणखी संधी मिळाली आणि त्यात समदने फ्री हिटवर षटकार ठोकत हैदराबादला जिंकवले.

अशा स्थितीत नो बॉलमुळे संदीप शर्माला आता अनेक लोक ट्रोल करत आहेत. त्याच्यावर टीका होत आहे. या घटनेवर प्रत्येक जण आपली मते मांडत आहे. त्याच वेळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुरली कार्तिकनेही या संपूर्ण घटनेवर आपले मत मांडले आहे. पण त्याने संदीप शर्मा नव्हे तर नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या फलंदाजांवर टीका केली आहे.

मुरली कार्तिकने नॉन स्ट्रायकर फलंदाजांला सुनावलं...

संदीप शर्माच्या नो बॉलचा जो फोटो व्हायरल होत आहे, त्या फोटोत नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला फलंदाज मार्को जॅनसेन क्रीजच्या बाहेर उभा होता. मुरली कार्तिकला ही गोष्ट दिसली आणि ते त्याला रूचले नाही. त्याने ट्विटरवर ट्विट करत लिहिले, "गोलंदाजाने रेषा ओलांडू नये (असा नियम आहे) आणि त्यासाठी त्याला पेनल्टीही बसते... पण नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजांचे काय, जे दबावाखाली क्रीजमधून बाहेर पडत राहतात? अशा गोष्टींना पेनल्टी रन, डॉट बॉल किंवा इतर कशाचीही शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा हे असंच होत राहील आणि गोलंदाजांवर अन्याय होत राहिल."

काही वेळा गोलंदाजांनी नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजांना क्रीजमधून बाहेर येताना पाहून धावबाद केल्याचीही उदाहरणं आहेत. याचे सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणजे रविचंद्रन अश्विन आणि जोस बटलर. 2019 च्या आयपीएलमध्ये, अश्विनने बटलरला नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी क्रीजमधून बाहेर येताना पाहून त्याला धावबाद केले होते, त्यानंतर बराच गोंधळ झाला होता. त्यानंतर मंकडिंगचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

Web Title: IPL 2023 Sandeep Sharma No ball controversy former Indian Murali Kartik cricketer says bowler has rules what about what about non strikers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.