IPL 2023 Schedule announced : मोठी बातमी ; गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना, IPL चे वेळापत्रक जाहीर

IPL 2023 Schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:07 PM2023-02-17T17:07:47+5:302023-02-17T17:08:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Schedule announced : IPL 2023 set to start on March 31st; CSK to face Gujarat Titans in the opening game of IPL 2023 on 31st March, Final of 21st May. | IPL 2023 Schedule announced : मोठी बातमी ; गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना, IPL चे वेळापत्रक जाहीर

IPL 2023 Schedule announced : मोठी बातमी ; गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना, IPL चे वेळापत्रक जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. महिला प्रीमिअर लीग ४ ते २६ मार्च या कालावधीत पार पडणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 रंगणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. १० फ्रँचायझींसह आयपीएलचे हे सलग दुसरे पर्व असणार आहे आणि २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये  फ्रँचायझींची वाट लावणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 चा पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अहमदाबाद येथे होणार आहे. 

काय सांगतोय Impact Player नियम?

  • कर्णधाराला ११ ऐवजी १२ खेळाडूंची निवड करावी लागेल आणि त्यातील  इम्पॅक्ट प्लेअर कर्णधार निवडेल
  • डावाच्या सुरुवातीला इम्पॅक्ट प्लेअर जाहीर करावा लागेल किंवा एक षटक संपल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट / बाद झाल्यानंतर  
  • गोलंदाजी करणारा संघ विकेट पडल्यानंतर षटकाच्या मध्येच इम्पॅक्ट प्लेअर खेळवू शकतो, परंतु त्याला ते षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मिळू शकत नाही. 
  • ज्या खेळाडूच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर मैदानावर उतरेल, त्या खेळाडूला नंतर संपूर्ण सामन्यात खेळता येणार नाही किंवा राखीव खेळाडू म्हणूनही मैदानावर उतरता येणार नाही.
  • इम्पॅक्ट प्लेअर हा कर्णधारासारखा वागू शकत नाही, इम्पॅक्ट प्लेअर जर जखमी झाला किंवा अचानक आजारी पडला तर राखीव खेळाडू मैदानावर उतरू शकतो. पण, अम्पायरला त्याची खात्री पटली तरच...  हा राखीव खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकत नाही.  
  • इम्पॅक्ट प्लेअर संपूर्ण ४ षटकं टाकू शकतो. संघाला प्लेइंग इलेव्हनसह ४ राखीव खेळाडूंची नावं जाहीर करावी लागतील आणि यापैकी १ खेळाडूच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर उतरू शकतो.  
  • दोन्ही संघ इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करू शकतात, परंतु तसे करायलाच हवं अशी सक्ती नाही. 

गुवाहाटी आणि धर्मशाला या दोन नव्या शहरांमध्ये यंदाच्या आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. एकूण १२ स्टेडियमवर साखळी फेरीतील ७० सामने खेळवले जातील. १८ डबल हेडर सामने असतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर ७ आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर ७ सामने खेळतील. 

IPL 2023चे वेळापत्रक पहिले पाच सामने 
३१ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स
१ एप्रिल - पंजाब किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स
१ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स
२ एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि.  राजस्थान रॉयल्स
२ एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

दोन गटांत विभागणी

  • ग्रुप ए - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
  • ग्रुप बी - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स 


 
IPL 2023 च्या पर्वातील टॉप महागडे खेळाडू...

पंजाब किंग्स - सॅम कुरन ( १८.५० कोटी)
मुंबई इंडियन्स - कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी)
चेन्नई सुपर किंग्स - बेन स्टोक्स ( १६.२५ कोटी)
लखनौ सुपर जायंट्स - निकोलस पूरन ( १६ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद- मयांक अग्रवाल ( ८.२५ कोटी)
 गुजरात टायटन्स - शिवम मावी ( ६ कोटी)
राजस्थान रॉयल्स - जेसन होल्डर ( ५.७५ कोटी)
दिल्ली कॅपिटल्स - मुकेश कुमार ( ५.५० कोटी)
सनरायझर्स हैदराबाद - हेनरीच क्लासेन ( ५.२५ कोटी)


 

Web Title: IPL 2023 Schedule announced : IPL 2023 set to start on March 31st; CSK to face Gujarat Titans in the opening game of IPL 2023 on 31st March, Final of 21st May.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.