IPL 2023 Schedule: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची मोठी अपडेट्स समोर येत आहेत. बीसीसीआयला आयपीएल २०२३ ही ७४ दिवसांची खेळलाची होती, परंतु आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तारखेमुळे बीसीसीआयची गोची झाली आहे. WTC Final ८ जूनपासून ओव्हल येथे सुरू होणार आहे आणि सद्यपरिस्थितीत भारतीय संघ जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाला भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बीसीसीआयला त्यांच्या नियोजनात बदल करावा लागणार आहे आणि त्यानुसार त्यांना वेळापत्रक आखावे लागणार आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२३ ला १ एप्रिलला सुरुवात होणार असून २८ मे रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयला ५८ दिवसांत ही स्पर्धा खेळवावी लागणार आहे.
''वेळापत्रकाबाबत आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबतची घोषणा होऊ शकते. महिला आयपीएल संघांबाबत निर्णय झाल्यानंतर आयपीएलची गव्हर्निंग काऊन्सिल बैठक पार पडेल. तेव्हा अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्यातरी मे अखेरपर्यंत आयपीएल संपवण्याचा विचार आहे , कारण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आहे, ''असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले.
- १ एप्रिलपासून आयपीएल २०२३ ची सुरुवात करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न
- २८ मे रोजी ( रविवारी) आयपीएल २०२३ ची फायनल होण्याची शक्यता
- ८ जूनला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला सुरुवात
- ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील सदस्य आयपीएल प्ले ऑफच्या सामन्याला मुकण्याची शक्यता
- भारतीय संघ WTC Final साठी पात्र ठरला तर भारतीय खेळाडू IPL 2023 प्ले ऑफमधून माघार घेऊ शकतात
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ किंवा त्याहून अधिक विजय मिळवला तर अन्य मालिकांचा निकाल काहीही लागला तरी टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरेल. बांगलादेशविरुद्ध २-० अशी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या ५८.९३ % सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असे जिंकल्यास ६८.०६%, ३-१ असे जिंकल्यास ६२.५% आणि २-२ अशी बरोबरी राहिल्यास ५६.९४% होतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023 Schedule: WTC Final starts June 8 in Oval, IPL 2023 will start on April 1 & Final likely on May 28, BCCI Official says
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.