IPL 2023: KKR चं 'टेन्शन' पुन्हा वाढलं! कर्णधार श्रेयस पाठोपाठ आणखी एका बडा खेळाडूही जखमी

१ एप्रिलला कोलकाताचा पंजाबशी सलामीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:30 PM2023-03-23T20:30:47+5:302023-03-23T20:31:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 setback to KKR as one more star cricketer all rounder injured after captain Shreyas Iyer Lockie Ferguson | IPL 2023: KKR चं 'टेन्शन' पुन्हा वाढलं! कर्णधार श्रेयस पाठोपाठ आणखी एका बडा खेळाडूही जखमी

IPL 2023: KKR चं 'टेन्शन' पुन्हा वाढलं! कर्णधार श्रेयस पाठोपाठ आणखी एका बडा खेळाडूही जखमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KKR, IPL 2023: कोलकाता नाइट रायडर्सला त्यांचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी खेळायचा आहे, जिथे त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. परंतु या सलामीच्या सामन्यातच त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर स्पर्धेतून जवळपास बाहेरच गेला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा नवा मोसम अद्याप सुरू झालेला नाही आणि काही संघांसाठी आधीच तणाव वाढला आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स अव्वल आहे, ज्यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. KKR चा कर्णधार श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या केकेआरला आता अनुभवी वेगवान गोलंदाजाच्या दुखापतीच्या रूपाने वाईट बातमी मिळाली आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या (Lockie Ferguson) दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्सची डोकेदुखी वाढली आहे. किवी वेगवान गोलंदाज हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे शनिवार, 25 मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत भाग घेणार नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी, 23 मार्च रोजी फर्ग्युसनच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. बोर्डाने सांगितले की, गुरुवारी संघाच्या सराव सत्रादरम्यान फर्ग्युसनची फिटनेस चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तो उत्तीर्ण झाला नाही. यामुळे तो मालिकेतील पहिल्या वनडेतून बाहेर पडला आहे.

फर्ग्युसनला या मालिकेतील फक्त पहिलाच सामना खेळायचा होता, त्यानंतर त्याला न्यूझीलंड संघाच्या इतर काही खेळाडूंसह भारतात जावे लागले, जिथे त्याला आयपीएल 2023 मध्ये भाग घ्यायचा आहे. आता केकेआरसमोर प्रश्न आहे की फर्ग्युसन हंगामाच्या सुरूवातीस सावरेल की नाही. IPL 2023 मध्ये KKR चा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध शनिवारी 1 एप्रिल रोजी आहे. लॉकी फर्ग्युसन गेल्या काही हंगामांपासून सतत आयपीएलचा भाग आहे. आयपीएल 2022 मध्ये तो गुजरात टायटन्ससोबत होता, जिथे त्यांनी विजेतेपद पटकावले. मात्र, त्यानंतर गुजरातने त्याला ट्रेड करून केकेआरकडे पाठवले. गुजरातमध्ये जाण्यापूर्वी फर्ग्युसन केकेआरचा भाग होता.

Web Title: IPL 2023 setback to KKR as one more star cricketer all rounder injured after captain Shreyas Iyer Lockie Ferguson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.