गुजरात टायन्सच्या कृपेने मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये; जाणून घ्या पुढील वेळापत्रक

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा आजचा साखळी सामन्यांचा शेवटचा दिवस रंजक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:29 AM2023-05-22T00:29:46+5:302023-05-22T00:30:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023 Shubman Gill has knocked out RCB, MUMBAI INDIANS HAVE QUALIFIED FOR PLAYOFFS, check the knock out timetable | गुजरात टायन्सच्या कृपेने मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये; जाणून घ्या पुढील वेळापत्रक

गुजरात टायन्सच्या कृपेने मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये; जाणून घ्या पुढील वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा आजचा साखळी सामन्यांचा शेवटचा दिवस रंजक ठरला. मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर थरारक विजयाची नोंद केली. कॅमेरून ग्रीनच्या शतकाने पाचवेळच्या विजेत्यांची लाज वाचवली. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाची त्यांना प्रतीक्षा होती. पावसामुळे RCB विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना होईल की नाही यात शंकाच होती. मात्र, उशीरा का होईना सामना झाला अन् त्यात दोन शतकं पाहायला मिळाली... 

विराट कोहलीने सलग दुसरे शतक झळकावून त्याचा क्लास दाखवून दिला, परंतु उगवता तारा असलेल्या शुबमन गिलने कमाल केली. विराटने ६१ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह १०१ धावा केल्या. अनुज रावतनेही ( २३) विराटसह ६४ धावा जोडल्या.  RCB ने ५ षटकांत १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, शुबमन गिलनेही नाबाद शतक झळकावले. विजय शंकर ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा करताना शुबमनसह १२३ धावांची ( ७१ चेंडू) महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शुबमनने ५२ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १०४ धावा केल्या. गुजरातने १९.१ षटकांत ४ बाद १९८ धावा करून सामना जिंकला.

मुंबई इंडियन्स चौथ्या सीटवर! विराटच्या खेळीला शुबमनचे शतकाने उत्तर, RCBचा पराभव   

विराट कोहलीने सातवे शतक ठोकले, अनुष्काने बेभान सेलिब्रेशन केले; Video Viral

अनेकांना वाटतं माझं ट्वेंटी-२० क्रिकेट संपलं, पण...! शतकानंतर विराट कोहलीनं टीकाकारांना झोडलं

गुजरातच्या विजयाने मुंबई इंडियन्स मात्र चौथ्या सीटवरून प्ले ऑफमध्ये पोहोचले. GT vs CSK यांच्यात क्वालिफायर १चा सामना २३ मे रोजी चेन्नईतील चेपॉकवर होणार आहे, तर २४ मे रोजी MI vs LSG अशी एलिमिनेटर लढत होईल. त्यानंतर क्वालिफायर २ सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २६ तारखेला होईल. यात क्वालिफायर १ मधील पराभूत आणि एलिमिनेटर मधील विजयी संघ खेळतील. २८ मे रोजी अहमदाबाद येथेच अंतिम सामना होईल. 

Web Title: IPL 2023 Shubman Gill has knocked out RCB, MUMBAI INDIANS HAVE QUALIFIED FOR PLAYOFFS, check the knock out timetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.