IPL 2023, SRH Captain :२०१६च्या आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबादने आज त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. भारताचा आघाडीचा फलंदाज मयांक अग्रवालल याच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला होता, परंतु SRH ने ही जबाबदारी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एडन मार्कराम ( Aiden Markram ) याच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मार्करामच्या नेतृत्वाखाली SRH फ्रँचायझीच्या सनरायझर्स ईस्टर्न केप संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग जिंकली. तोच करिष्मा आयपीएल २०२३ मध्येही दिसेल असा विश्वास फ्रँचायझीला आहे.
सनरायझर्स हैदराबादने मागील पर्वात केन विलियम्सन, निकोलस पूरन यांना संघातून रिलीज केले. अशात त्यांच्याकडे कर्णधारपदासाठी यंदा मयांकसह मार्कराम व भुवनेश्वर कुमार हे पर्याय होते. मयांकने आयपीएलच्या मागील पर्वात पंजाब किंग्सचे नेतृत्व संभाळले होते, परंतु त्याचा फॉर्म निराशाजनक राहिला होता. एडन मार्करामने एकूण १०७ ट्वेंटी-२० सामन्यांत २७७० धावा आणि २६ विकेट्स घेतल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबाद - अब्दुल समद, उम्रान मलिक, एडन मार्कराम, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, टी नटराजन, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, एफ फारूकी, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, हेनरिच क्लासेन, आदिल राशिद, मयांक मार्कंडे, मयांक अग्रवाल, विव्रंत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयांक डागर, नितिश रेड्डी, अकिल होसैन, अनमोलप्रीत सिंग
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, SRH Captain : Not Mayank Agarwal; Aiden Markram appointed as the captain of Sunrisers Hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.