Join us  

IPL 2023: सनरायझर्स हैदराबादने बंगळुरुसह मुंबई अन् दिल्लीलाही टाकलं मागे, राजस्थान नंबर १, पाहा Points Table

IPL Points Table 2023: हैदराबादच्या या विजयानंतर आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत देखील मोठे बदल झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 9:26 AM

Open in App

सनरायझर्स हैदराबादने सलग दुसरा विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) त्यांच्याच मैदानावर २३ धावांनी नमवले. यासह हैदराबादने गुणतालिकेत दोन स्थानांनी प्रगती करत सातवे स्थान पटकावले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर हैदराबादने २० षटकांत ४ बाद २२८ धावांचा डोंगर उभारला. यानंतर त्यांनी कोलकाताला २० षटकांत ७ बाद २०५ धावांवर रोखले. 

नितीशने नारायण जगदीशनसोबत चौथ्या गड्यासाठी २९ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. जगदीशन बाद झाल्यानंतर लगेच आंद्रे रसेलही परतल्याने कोलकाताने सावध घेतला. यानंतर मात्र, राणाने रिंकू सिंगसोबत हल्ला चढवताना सहाव्या सहाव्या ३९ चेंडूंत ६९ धावांची भागिदारी केली. ही जोडी कोलकाताला रोमांचक विजय मिळवून देणार, असं वाटत असताना, टी. नजराजनने १७ व्या षटकात राणाला बाद केले आणि सामना हैदराबादच्या बाजूने झुकला.

सौंदर्यात अभिनेत्रीपेक्षा कमी नाही हॅरी ब्रूकची गर्लफ्रेंड; तडाखेबंद शतक ठोकल्यानंतर म्हणाला...

हैदराबादच्या या विजयानंतर आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत देखील मोठे बदल झाले आहे. हैदराबादने सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत ७ व्या स्थानी झेप घेतली आहे. तर कोलकात चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानी राजस्थान रॉयल्स, दूसऱ्या स्थानी लखनऊ सुपय जायट्स आणि तिसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स संघ आहे. चेन्नई सुपरकिंग्स पाचव्या स्थानी असून पंजाब किंग्स सहाव्या स्थानी आहे. हैदराबादच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. तर मुंबई इंडियन्सची देखील क्रमवारीत नवव्या स्थानी घसरण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स ४ सामन्यात एकही विजय न मिळवल्याने अजूनही दहाव्या स्थानी आहे. 

दरम्यान, भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताची चौथ्या षटकात ३ बाद २० धावा अशी अवस्था झाली होती. परंतु, कर्णधार नितीश राणाने जबरदस्त आक्रमकता दाखवताना हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. त्याने वेगवान गोलंदाज उमरान मलिकला टार्गेट करताना सहाव्या षटकात त्याचे सहाही चेंडू सीमापार धाडले. यामध्ये त्याने एक षटकार व पाच चौकारांसह २६ धावा वसूल केल्या.

हॅरी ब्रूकचे नाबाद शतक-

हॅरी ब्रूकने झळकावलेले तडाखेबंद नाबाद शतक हैदराबादच्या विजयात निर्णायक ठरले. हॅरी ब्रूकने शतक झळकावत हैदराबादला द्विशतकी धावसंख्या उभारुन दिली. ब्रूकने आयपीएलमधील आपल्या पहिल्या अर्धशतकी खेळीचे शतकात रूपांतर केले. तसेच, ब्रूकने झळकावलेले शतक यंदाच्या सत्रातील पहिलीच शतकी खेळी ठरली. 

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स
Open in App