दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; सनरायझर्स हैदराबादकडून स्वप्नाचा चुराडा

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने मागील मॅच जिंकून चाहत्यांना आशेचा किरण दाखवला होता, परंतु सनरायझर्स हैदराबादने आज त्यांना जवळपास स्पर्धेबाहेर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:10 PM2023-04-29T23:10:53+5:302023-04-29T23:11:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs DC Live : Delhi Capitals out of playoff race; Sunrisers Hyderabad beat by 9 runs | दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; सनरायझर्स हैदराबादकडून स्वप्नाचा चुराडा

दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; सनरायझर्स हैदराबादकडून स्वप्नाचा चुराडा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने मागील मॅच जिंकून चाहत्यांना आशेचा किरण दाखवला होता, परंतु सनरायझर्स हैदराबादने आज त्यांना जवळपास स्पर्धेबाहेर फेकले. DC ने पहिल्या टप्प्यात ७ पैकी २ सामने जिंकले होते आणि त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित ७ सामने जिंकणे गरजेचे होते. पण, आज SRHने त्यांचा घात केला. आता त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे, कारण चार संघ १०+ गुणांसह टॉप फोअर मध्ये आहेत.

अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन यांनी हैदराबादला ६ बाद १९७ धावांचा डोंगर उभा करून दिला.  DCचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने उल्लेखनीय गोलंदाजी करताना ४-१-२७-४ अशी स्पेल टाकली. पण, अभिषेक व क्लासेन यांना तो रोखू शकला नाही. अभिषेकने ३६ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ६७ धावा केल्या. अब्दुल समद व हेनरिच क्लासेन यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. अब्दुल समदला २८ धावांवर त्याने बाद केले. क्लासेनने २७ चेंडूंत ५३ धावा केल्या. त्याने २ चौकार व ४ षटकार खेचले. अकिल होसेनने नाबाद १६ धावा केल्या.


भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला भोपळ्यावर माघारी पाठवून दिल्लीची डोकेदुखी वाढवली. फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी DC च्या डावाला आकार देताना अर्धशतकी भागीदारी केली. सॉल्ट आणि मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांची ६६ चेंडूंतील ११२ धावांची भागीदारी मयांक मार्कंडेने संपुष्टात आणली. सॉल्ट ३५ चेंडूंत ९ चौकारांसह ५९ धावांवर मार्कंडेच्या हाती कॉट अँड बोल्ड झाला. मनीश पांडे ( १) अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग झाला. अकिल होसैनने SRHला मोठी विकेट मिळवून दिली. मार्श ३९ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ६३ धावांवर झेलबाद झाला.   


इथून दिल्लीच्या हातून सामना सटकत चालला.. धावा आणि चेंडू यांच्यातले अंतर वाढत गेले. सर्फराज खान आणि अक्षर पटेल यांच्यावर आता दिल्लीची सर्व भीस्त होती, परंतु सर्फराज ( ९) पुन्हा अपयशी ठरला.  १८ चेंडूंत ४८ धावांची दिल्लीला गरज होती. सामना ६ चेंडूंत २६ धावा असा चुरशीचा आला अन् त्यांना kkrच्या रिंकू पटलेसारख्या करिम्ष्याची गरज होती. अक्षर पटेलने प्रयत्न केले, परंतु ते अपयशी ठरले. DC ला ६ बाद १८८ धावाच करता आल्या आणि हैदराबादने ९ धावांनी ही मॅच जिंकली. 


प्ले ऑफचे समीकरण
गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या खात्यात प्रत्येकी १० गुण आहेत. अशात प्ले ऑफच्या शर्यतीत हेच संघ आघाडीवर आहेत. दिल्ली कॅपिटल्सने ८ पैकी ६ सामने गमावले आहेत आणि त्यांना आता उर्वरित सहा सामने जिंकूनही १८ गुणांपर्यंत पोहोचता येईल. हे गणित अशक्य आहे, कारण चार संघ १०+ गुणांसह आघाडीवर आहेत.

Web Title: IPL 2023, SRH vs DC Live : Delhi Capitals out of playoff race; Sunrisers Hyderabad beat by 9 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.