IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Marathi : डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ४ वर्षांनंतर हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर परतला... सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार वॉर्नर आज दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून मैदानावर उतरला. पण, त्याच्यावरील हैदराबादच्या चाहत्यांचे प्रेम तसूभरही कमी झालेलं दिसलं नाही. वॉर्नरची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी हॉटेलबाहेर गराडा घातला होताच, शिवाय स्टेडियमवरही मोठ्या संख्येने वॉर्नरला पाठींबा मिळताना दिसतोय. SRHने वॉर्नरला रिलीज केल्याचे चाहत्यांना आवडले नव्हते आणि त्यांनी तशी नाराजी व्यक्तही केली होती. वॉर्नरवरील त्यांचे प्रेम आजही कायम असल्याचे दिसले. DCचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
डेव्हिड वॉर्नरने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ३१ इनिंग्जमध्ये ६६.७५च्या सरासरीने १६०२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा १६१.६५ इतका असून त्याने येथे १५ अर्धशतकं व ३ शतकं झळकावली आहेत. पण, ही खेळी त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी केली होती आणि आज ४ वर्षांनी तो SRHविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नरचा चौथा क्रमांका येतो. विराट कोहली व एबी डिव्हिडिलियर्स यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर अनुक्रमे २५४५ व १९६० धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर १६०२ धावा केल्या आहेत.
SRH कडून वॉर्नरने ४९.६च्या सरासरीने ४०१४ धावा केल्या आहेत आणि ३ वेळ ऑरेंज कॅप व ६ पर्वात ५००+ धावा त्याने केल्या आहेत. २०१६मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली SRH ने जेतेपद पटकावले होते. पृथ्वी शॉला आज दिल्लीने संघात स्थान दिलेले नाही आणि त्याच्या जागी ओपनिंगला आलेला फिल सॉल्ट पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, मिचेल मार्शने दुसऱ्या षटकात मार्को यान्सेनला चार चौकारांसह १९ धावा चोपल्या. भुवी चांगला मारा करत होता, त्याने दोन षटकांत २ धावा देत १ विकेट घेतलेली. वॉर्नरने IPL 2023 मधील पहिला षटकात हैदराबादविरुद्ध हैदराबादमध्ये खेचला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IPL 2023, SRH vs DC Live Marathi : David Warner scored Most runs in Hyderabad in IPL, hit first six in this ipl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.