IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Marathi : दिल्ली कॅपिटल्सच्या मागे लागलेले अपयश काही केल्या त्यांचा पाठलाग सोडण्याचं नाव घेताना दिसत नाही. मिचेल मार्श व डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार खेळीनंतरही सनरायझर्स हैदाराबादने DCचा निम्मा संघ ६२ धावांवर माघारी पाठवला आहे. वॉशिंग्टन सुंदरने ( Washington Sundar ) एका षटकात दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. त्यात वॉर्नरची मोठी विकेटही होती आणि DCही ही अवस्था पाहून SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) खूपच आनंदी दिसली.
डेव्हिड वॉर्नर ( David Warner) ४ वर्षांनंतर हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर परतला... DCचा कर्णधार वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळालेला फिल सॉल्ट पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. मिचेल मार्शने दुसऱ्या षटकात मार्को यान्सेनला चार चौकारांसह १९ धावा चोपल्या. भुवी चांगला मारा करत होता, त्याने दोन षटकांत २ धावा देत १ विकेट घेतलेली.
टी नटराजनने पाचव्या षटकात मार्शला ( २५) पायचीत केले. SRH ने घेतलेला DRS यशस्वी ठरला. वॉर्नरने आयपीएल २०२३ मधील पहिला षटकार आज खेचला अन् त्याने Six चे १०० साजरे केले. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी ( २१४), विराट कोहली (१६८), रोहित शर्मा ( १५१) आणि वॉर्नर ( १००) यांनी सर्वाधिक षटकार खेचले आहेत. वॉशिंग्टन सुंदरने मात्र वॉर्नरची ( २१) खेळी संपुष्टात आणली. दिल्लीला ५७ धावांवर तिसरा धक्का बसला. त्याच षटकात दिल्लीला आणखी दोन धक्के बसले... सर्फराज खान ( १०) व अमन खान ( ४) हे माघारी परतल्याने दिल्लीची अवस्था ५ बाद ६२ अशी झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"