IPL 2023, SRH vs KKR Live : चीते की चाल और बाज की नजर! एडन मार्करामने टीपला अविश्वसनीय झेल, KKRचा कॅप्टन OUT

तीन फलंदाज 35 धावांवर माघारी परतले होते आणि रिंकू सिंग व कर्णधार नितीश राणा यांनी डाव सावरला. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:37 PM2023-05-04T20:37:14+5:302023-05-04T20:38:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs KKR Live Marathi : Brillient Catch! Captain Aiden Markram strikes for SRH, Gets Nitish Rana for 42 in 31 balls, Video  | IPL 2023, SRH vs KKR Live : चीते की चाल और बाज की नजर! एडन मार्करामने टीपला अविश्वसनीय झेल, KKRचा कॅप्टन OUT

IPL 2023, SRH vs KKR Live : चीते की चाल और बाज की नजर! एडन मार्करामने टीपला अविश्वसनीय झेल, KKRचा कॅप्टन OUT

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सला आजही अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. त्यांचे तीन फलंदाज 35 धावांवर माघारी परतले होते आणि रिंकू सिंग व कर्णधार नितीश राणा यांनी डाव सावरला. पण, SRH चा कर्णधार एडन मार्करामने ही भागीदारी तोडली अन् KKRचा कर्णधार नितीशला अविश्वसनीय झेल घेत माघारी पाठवले. 

६ फुट उंचीच्या गोलंदाजाने कमाल केली, काव्या मारन जागेवर उभी राहून जल्लोष करू लागली


KKRने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो त्यांना महागात पडला. KKRच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा घाई केली अन् चुकीचे फटके मारून विकेट्स फेकल्या. मार्को यान्सेन दुसरे षटक टाकायला आला अन् त्याने त्या षटकात रहमानुल्लाह गुरबाज ( ०) व वेंकटेश अय्यर ( ७) यांची विकेट मिळवली. कार्तिक त्यागीला पाचव्या षटकात गोलंदाजीवर आणले अन् जेसनने मारलेला खणखणीत फटका यष्टीरक्षक रिली रोसोवूने टिपला, परंतु फ्री हिट असल्याने जेसन नाबाद राहिला. पण, तिसऱ्या चेंडूवर कार्तिकला यश मिळाले अन् जेसनला २० धावांवर माघारी पाठवले. कोलकाताला ३५ धावांवर तिसरा धक्का बसला.  


रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा यांनी समजूतदारीने खेळ सुरू ठेवला. कार्तिकने टाकलेल्या १०व्या षटकात रिंकूने ४,६,६ अशा १७ धावा चोपल्या. KKRला १० षटकांपर्यंत ३ बाद ९० धावांपर्यंत पोहोचवले. १२व्या षटकात एडन मार्करामने त्याच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत ही जोडी तोडली. नितीश ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर बाद झाला. 

Web Title: IPL 2023, SRH vs KKR Live Marathi : Brillient Catch! Captain Aiden Markram strikes for SRH, Gets Nitish Rana for 42 in 31 balls, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.