IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सला आजही अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जेसन रॉयने काही सुरेख फटके मारले, परंतु सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज मार्को यान्सेन याने त्याच्या पहिल्या व संघाच्या दुसऱ्या षटकात दोन धक्के दिले. आयपीएल २०२३ मधील पहिलाच सामना खेळणारा कार्तिक त्यागीने पहिल्याच षटकात KKRचा स्फोटक फलंदाज जेसन रॉयला माघारी पाठवले. पॉवर प्लेमधील गोलंदाजांची ही कामगिरी पाहून SRHची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) खूपच आनंदीत झाली अन् जागेवर उभी राहून जल्लोष करू लागली.
एका संघाचे १२, दोघांचे ११ अन् चौघांचे गुण दहा; प्ले ऑफचं गणित सहज समजून घ्या!
गुणतालिकेत हैदराबाद आणि कोलकाता प्रत्येकी ६ गुणांवर आहेत, परंतु हैदराबादने एक सामना कमी खेळला असल्याने त्यांना प्ले ऑफच्या शर्यती राहण्याची अतिरिक्त संधी आहे. KKRचा एक पराभव अन् त्यांचे आव्हान संपल्यात जमा होणारे आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारच्या तिसऱ्याच चेंडूवर अब्दुल समदने KKRच्या जेसन रॉयचा झेल सोडला. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या रॉयने नंतर दोन चौकार खेचले. दुसऱ्या षटकात मार्को यान्सेनचा पहिलाच चेंडू मारण्यासाठी रहमानुल्लाह गुरबाज पुढे आला अन् चेंडू उंच उडाला. हॅरी ब्रूकने सोपा झेल घेत KKRला ८ धावांवर पहिला धक्का दिला. मार्को यान्सेनने दुसऱ्या षटकात KKRला दुसरा धक्का देताना अप्रतिम बाऊन्सवर वेंकटेश अय्यरची ( ७) विकेट मिळवली.
कार्तिक त्यागीला पाचव्या षटकात गोलंदाजीवर आणले अन् जेसनने मारलेला खणखणीत फटका यष्टीरक्षक रिली रोसोवूने टिपला, परंतु फ्री हिट असल्याने जेसन नाबाद राहिला. पण, तिसऱ्या चेंडूवर कार्तिकला यश मिळाले अन् जेसनला २० धावांवर माघारी पाठवले. कोलकाताला ३५ धावांवर तिसरा धक्का बसला.