IPL 2023, SRH vs KKR Live : वरुणने 'चक्र' फिरवले; कोलकाताने आव्हान राखले, हैदराबादने हातचा सामना गमावला

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत हार मानावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:27 PM2023-05-04T23:27:13+5:302023-05-04T23:30:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs KKR Live Marathi : Kolkata Knight Riders win by 5 runs, VARUN CHAKRAVARTHY - THE HERO OF KKR. He defended 9 runs in the final over | IPL 2023, SRH vs KKR Live : वरुणने 'चक्र' फिरवले; कोलकाताने आव्हान राखले, हैदराबादने हातचा सामना गमावला

IPL 2023, SRH vs KKR Live : वरुणने 'चक्र' फिरवले; कोलकाताने आव्हान राखले, हैदराबादने हातचा सामना गमावला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत हार मानावी लागली. आज पराभवाचा सामना करावा लागल्याने SRHचेही स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कोलकाता नाइट रायडर्सही त्याच नावेवर स्वार आहे, फक्त आजच्या विजयाने त्यांना आशेचा किरण दाखवला आहे. वरुण चक्रवर्थीने २०वे षटक अप्रतिम टाकले अन् KKRने रोमहर्षक विजयाची नोंद केली. 

मयांक अग्रवाल आज चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु १८ धावांवर हर्षित राणाने अप्रतिम बाऊन्सर टाकून त्याला बाद केले. शार्दूल ठाकूरने SRHचा दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा ( ९) याला बाद करून KKRला मोठे यश मिळवून दिले. राहुल त्रिपाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आला. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर त्रिपाठीने ५nb,६,४ अशा धावा चोपल्या, परंतु तिसऱ्या चेंडूवर मारलेला स्वीप फसला. अरोराने सीमारेषेवर त्याचा झेल टिपला. त्रिपाठी ९ चेंडूंत २० धावा करून माघारी परतला. इम्पॅक्ट प्लेअर अनुकूल रॉयने ७व्या षटकात हॅरी ब्रूकला ( ०) पायचीत केले. KKR ने घेतलेला DRS योग्य ठरला.  अनुकूलने टाकलेल्या ११व्या षटकात एडन मार्कराम व हेनरिच क्लासेन यांनी दोन खणखणीत षटकार खेचत १५ धावा जोडल्या. 

SRHसमोर ५४ चेंडूंत ८२ धावा करण्याचे आव्हान होते आणि मार्कराम व क्लासेन यांनी ३७ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चांगली फटकेबाजी करताना दिसल्याने SRHच्या आशा उंचावल्या होत्या. ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्याने कमाल केली. क्लासेन २० चेंडूंत ३६ धावांवर रसेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला अन् मार्करामसोबतची ७० धावांची ( ४७ चेंडू) भागीदारी संपुष्टात आली. तरीही शार्दूलच्या त्या षटकात १० धावा करून हैदराबादने मॅच ३० चेंडू ३८ धावा अशी जवळ आणली. 


वरूण चक्रवर्थीने १६व्या षटकात केवळ चार धावा दिल्याने सामना रंगतदार अवस्थेत आला. वैभव अरोराच्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार लागला, परंतु चौथ्या चेंडूवर मार्करामने चुकीचा फटका मारला. मार्कराम ४१ धावांवर झेलबाद झाला. समद व मार्को यान्सेन यांना १८व्या षटकात वरूणने केवळ ५ धावा दिल्या, परंतु KKRच्या खेळाडूंनी रन आऊट करण्याच्या तीन संधी गमावल्या. अरोराने १९व्या षटकात यान्सेनला बाद करून सामना फिरवला, यष्टिरक्षक गुरबाजने अफलातून झेल टिपला. ११ चेंडूंत २० धावा हैदराबादला करायच्या होत्या. भुवीने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला, त्यात नो बॉलवर आणखी एक चौकार मिळाला. ६ चेंडू ९ धावा अशी लढत चुरशीची आली. वरुणच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर अब्दुल ( २१) झेलबाद झाला अन् ३ चेंडू ७ धावा हव्या होत्या. पण, हैदराबादला 8 बाद 166 धावाच करता आल्या आणि कोलाकाताने 5 धावांनी सामना जिंकला

तत्पूर्वी, KKRच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले. रिंकू सिंगने ( Rinku Singh) एकट्याने खिंड लढवताना सन्मानजनक पल्ला गाठून दिला. रहमानुल्लाह गुरबाज ( ०) व वेंकटेश अय्यर ( ७) हे दुसऱ्या षटकात मार्को यान्सनेच्या गोलंदाजीवर माघारी परतले. कार्तिक त्यागीने जेसन रॉयची ( २०) विकेट मिळवून दिली. रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा ( ४२) यांनी ६१ धावांची भागीदारी करताना KKRला रुळावर आणले. आंद्रे रसेल ( २४) माघारी परतल्यानंतर रिंकूने खिंड लढवली. त्याने ४६ धावा केल्या आणि कोलकाताला ९ बाद १७१ धावांवर पोहोचवले.
 

Web Title: IPL 2023, SRH vs KKR Live Marathi : Kolkata Knight Riders win by 5 runs, VARUN CHAKRAVARTHY - THE HERO OF KKR. He defended 9 runs in the final over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.