Harry Brook, IPL 2023 SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने गुरुवारी झालेल्या IPL सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. खराब फलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने जिंकता येणारा सामना विचित्र पद्धतीने गमावला. सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामागे त्यांचा एक खेळाडू सर्वात मोठा खलनायक ठरल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. या खेळाडूला ताबडतोब सनरायझर्स हैदराबाद संघातून वगळण्यात यावे, अशी मागणी आता क्रिकेटचे जाणकार आणि चाहत्यांकडून केली जात आहे.
'हा' खेळाडू हैदराबादच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक!
कोलकाता विरूद्धच्या फ्लॉप शो मुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने एका खेळाडूवर खर्च केलेले 13.25 कोटी रुपये म्हणजे मोठी चूक असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने 13.25 कोटी रुपये खर्च करून इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकचा IPL 2023 हंगामासाठी आपल्या संघात समावेश केला होता, परंतु या फलंदाजाची कामगिरी 20 लाखांच्या खेळाडूइतकीही प्रभावी दिसली नाही असे चाहते म्हणताना दिसत आहेत. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात हॅरी ब्रूक शून्यावर आऊट झाला, त्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला.
चाहते म्हणाले- आधी त्याला संघाबाहेर हकला...
हॅरी ब्रूकच्या खराब फलंदाजीने सनरायझर्स हैदराबाद संघाचे चाहतेही संतापले. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूक शून्यावर आऊट झाल्यानंतर टीकेला सामोरा गेला. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबाद संघातून वगळण्याची मागणी केली असून त्याऐवजी न्यूझीलंडचा झंझावाती फलंदाज ग्लेन फिलिप्सला मधल्या फळीत संधी देण्याची मागणी केली.
गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात हॅरी ब्रूकने 4 चेंडूंचा सामना केला आणि शून्य या धावसंख्येवर बाद झाला. ब्रेट ली म्हणाला, 'हॅरी ब्रूक हा चांगला खेळाडू असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. हॅरी ब्रूकनेही आयपीएल 2023 मध्ये शतक झळकावले आहे. कदाचित काही सामन्यांमध्ये हॅरी ब्रूकच्या जागी आणखी कोणालातरी आणावे. ब्रूकसमोर कोणीही चालत नाही. तो स्फोटक खेळाडू आहे. पण सध्या योग्य मानसिकतेत नाहीत. हॅरी ब्रूक आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. IPL 2023 च्या 9 सामन्यांमध्ये हॅरी ब्रूकने 20.38 च्या खराब सरासरीने फक्त 163 धावा केल्या आहेत. अशा वेळी त्याला संघातून बाहेर हकला नि दुसऱ्यांना संधी द्या."
Web Title: IPL 2023 SRH vs KKR Throw out Harry Brook of the team and give others a chance Fans and Brett Lee angry after Hyderabad defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.