- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
लखनौ : सनरायझर्स हैदराबादपुढे शुक्रवारी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. लखनौला घरच्या मैदानाचा लाभ मिळेल. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सकडून सलामीला पराभूत झालेल्या सनरायझर्सचे मनोबल ढासळले आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेचा ऐडन मार्कराम कर्णधार म्हणून संघात परतल्यामुळे संघ विजयी पथावर येईल का, हे पाहावे लागेल. राष्ट्रीय संघासोबत असल्याने मार्कराम पहिल्या सामन्यास मुकला होता. त्यावेळी भुवनेश्वर कुमारने संघाचे नेतृत्व केले.
लखनौकडून काइल मेयर्सने फलंदाजीत, तर मार्क वुडने गोलंदाजीत लक्षवेधी कामगिरी केली. द. आफ्रिकेचा यष्टिरक्षक, फलंदाज क्विंटन डिकॉक परतल्यास मार्क्स स्टोयनिस याला बाहेर बसावे लागेल. कर्णधार लोकेश राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.
या खेळाडूंवर असेल नजर
- काइल मायर्स : सलामीचा आक्रमक फलंदाज.
- मार्क वुड : वेगवान गोलंदाज, लोकेश राहुल : कर्णधार, पण सलामीला धावा काढण्यासाठी झगडत आहे.
- हैरी ब्रुक : प्रतिभावान फलंदाज, पण पहिल्या सामन्यात अपयशी ठरला.
- आदिल राशिद : फिरकीपटू, पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी.