IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सने हातातून गेलेला सामना खेचून आणला. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली होती, परंतु १६व्या षटकाने संपूर्ण मॅच फिरली. पार्ट टाईम गोलंदाज अभिषेक शर्माला ते षटक देणे SRHला चांगलेच महागात पडले अन् निकोलस पूरनने ( Nicholas Pooran) त्यानंतर वर्चस्व गाजवले. SRHची मालकिण काव्या मारनने ऑक्शनपूर्वी केन विलियम्सन आणि निकोलस यांना SRHच्या ताफ्यातून रिलीज केले होते आणि तोच निकोलस आज LSGकडून खेळला अन् हैदराबादला त्यांच्याच घरच्या मैदानावर पुरून उरला.
लखनौला शेवटच्या पाच षटकांत विजयासाठी ६९ धावा करायच्या होत्या अन् कर्णधार एडन मार्करामने चेंडू अभिषेकच्या हाती दिला. मार्कस स्टॉयनिसने सलग दोन षटकार खेचून त्याचे स्वागत केले. पण, तिसऱ्या चेंडूवर स्टॉयनिस झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा केल्या. त्यानंतर आलेल्या पूरनने सलग ३ षटकार खेचले. अभिषेकच्या त्या षटकात ५ षटकारांमुळे ३१ धावा जोडल्या गेल्या अन् LSGसाठी २४ चेंडूंत ३८ धावा असा सामना हातात आला. पूरन आणि मंकड यांनी ही मॅच सहज जिंकली. मंकड ४५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. पूरनने १३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावा चोपल्या. हैदराबादने ३ बाद १८५ धावा करून मॅच जिंकली.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग भारताच्या वन डे संघात; रोहित, विराट यांना दिली जाणार विश्रांती
कृणाल पांड्याचे २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video
SRH च्या चाहत्यांनी LSGच्या डग आऊटवर काहीतरी फेकले, कोहलीचे नारे दिले; फुल राडा
तत्पूर्वी, हेनरिच क्लासेन ( ४७) आणि अब्दुल समद ( ३७) यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या ५८ धावांच्या भागीदारीमुळे सनरायझर्स हैदराबादने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. क्लासेन व समद यांनी चांगली फटकेबाजी करून संघाला ६ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले
Web Title: IPL 2023, SRH vs LSG Live Marathi : 6,6,6,2,1,1,4,4,1,6,1,1,2,4 vs SRH, Nicholas Pooran smashed 44*(13) and won the match for LSG, he and Marcus Stoinis hits - 6,6,W,6,6,6 vs Abhishek Sharma in an over (30 runs), watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.