Join us  

IPL 2023, SRH vs LSG Live : लखनौला धावांचा 'अभिषेक'; LSGच्या प्रेरक विजयामुळे Play Offsमधून हैदराबादचे पॅकअप!

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सने खराब सुरुवातीनंतरही सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 7:08 PM

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सने खराब सुरुवातीनंतरही सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. हैदराबादच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे तितकं सोपं नव्हतं, परंतु प्रेरक मंकड व मार्कस स्टॉयनिस ही जोडी शड्डू ठोकून उभी राहिली. SRH च्या गोलंदाजांना पहिल्या १० षटकांतील सातत्य दुसऱ्या टप्प्यात राखता आले नाही आणि LSGसाठी हिच जमेची बाजू ठरली. लखनौने या विजयासह Point Table मध्ये १३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली अन् SRHचे पॅकअप केले. अभिषेक शर्माने टाकलेले १६ वे षटक मॅचला कलाटणी देणारे ठरले. त्या षटकात पाच Six मारले गेले. 

SRHच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून चांगला मारा करताना आक्रमक कायले मायर्सला जखडून ठेवले होते आणि त्या दबावात मायर्सने चौथ्या षटकात विकेट फेकली. ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर मायर्स ( २ धावा, १४ चेंडू) मार्करामच्या हाती झेल देऊन परतला.  हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगला मारा सूरू होता अन् सातव्या षटकात क्विंटनने हात मोकळे करून ६,४ मारला. पण, मयांक मार्कंडेच्या फिरकीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन ( २९) झेलबाद झाला. लखनौला १० षटकांत २ बाद ६८ धावा करता आल्या. प्रेरक मंकड आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यावर आता सर्व भिस्त होती अन् प्रेरकच्या फटकेबाजीने LSG च्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या.

मंकड व स्टॉयनिस यांनी ३८ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली आणि LSGला ३६ चेंडूंत ८० धावा करायच्या होत्या. मंकडनेही ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. १६व्या षटकात अभिषेक शर्माच्या षटकात स्टॉयनिसने दोन षटकार खेचले, परंतु तिसऱ्या चेंडूवर आणखी एक Six मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. स्टॉयनिस २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा करून माघारी परतला अन् मंकडसोबत त्याची ७३ ( ४३ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. निकोलस पूरनने सलग ३ षटकार खेचले.

अभिषेकच्या त्या षटकात ५ षटकारांमुळे ३१ धावा जोडल्या गेल्या अन् LSGला आता २४ चेंडूंत ३८ धावाच करायच्या होत्या. पूरन आणि मंकड यांनी ही मॅच सहज जिंकली. मंकड ४५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. पूरनने १३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावा चोपल्या. हैदराबादने ३ बाद १८५ धावा करून मॅच जिंकली. आजच्या पराभवामुळे SRHचे ११ सामन्यांत ७ पराभवांसह केवळ ८ गुण राहिले आहेत आणि LSG ने १२ सामन्यांत सहावा विजय मिळवून १३ गुणांसह तालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतलीय.

आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या 

यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग भारताच्या वन डे संघात; रोहित, विराट यांना दिली जाणार विश्रांती

कृणाल पांड्याचे २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video 

 SRH च्या चाहत्यांनी LSGच्या डग आऊटवर काहीतरी फेकले, कोहलीचे नारे दिले; फुल राडा

तत्पूर्वी, हेनरिच क्लासेन ( ४७) आणि अब्दुल समद ( ३७) यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या ५८ धावांच्या भागीदारीमुळे सनरायझर्स हैदराबादने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांसमोर SRHच्या फलंदाजांना मोठी भागीदारी साकारता आली नाही. पण, क्लासेन व समद यांनी चांगली फटकेबाजी करून संघाला ६ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले. अनमोलप्रीत सिंग ( २७) आणि अभिषेक शर्मा ( ७) यांना १९ धावांचीच भागीदारी करता आली. राहुल त्रिपाठीही २० धावांवर माघारी परतला. १३व्या षटकात कृणाल पांड्याने सलग दोन चेंडूवर एडन मार्कराम ( २८) व ग्लेन फिलिप्स ( ०) यांना बाद करून सामना फिरवला. क्लासेन व समद यांनी सर्व चित्र बदलले.

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्स
Open in App