IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Live Marathi : हेनरिच क्लासेन ( ४७) आणि अब्दुल समद ( ३७) यांनी अखेरच्या टप्प्यात केलेल्या भागीदारीमुळे सनरायझर्स हैदराबादने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांसमोर SRHच्या फलंदाजांना मोठी भागीदारी साकारता आली नाही. पण, क्लासेन व समद यांनी चांगली फटकेबाजी करून संघाला ६ बाद १८२ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, हा सामना गाजतोय तो १९व्या षटकात झालेल्या राड्यामुळे...
हैदराबादने नाणेफेक जिंकून LSG विरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अनमोलप्रीत सिंग ( २७) आणि अभिषेक शर्मा ( ७) यांना १९ धावांचीच भागीदारी करता आली. राहुल त्रिपाठीही २० धावांवर माघारी परतला. १३व्या षटकात कृणाल पांड्याने सलग दोन चेंडूवर एडन मार्कराम ( २८) व ग्लेन फिलिप्स ( ०) यांना बाद करून सामना फिरवला. पांड्याने टाकलेले चेंडू दोन्ही फलंदाजांना कळलेच नाही. हेनरिच क्लासेन व अब्दुल समद यांनी सर्व चित्र बदलले आणि ५८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आवेशने १९व्या षटकात क्लासेनला २९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद केले.
आयपीएलच्या आणखी महत्त्वाच्या बातम्या
यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग भारताच्या वन डे संघात; रोहित, विराट यांना दिली जाणार विश्रांती
कृणाल पांड्याचे २ unplayable चेंडू! हैदराबादच्या फलंदाजांचे उडवले 'दांडू' Video
क्लासेनच्या विकेटपूर्वी राडा...
१९व्या षटकार सामना थांबवावा लागला. आवेश खानने तिसरा चेंडू फुलटॉस टाकला अन् मैदानावरील अम्पायरने नो बॉल दिला. पण, LSGने DRS घेतला अन् त्यावर हा निर्णय बदलला गेला. क्लासेन या निर्णयावर नाखूश दिसला, कारण रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु फलंदाज किंचितसा पुढे असल्याने तिसऱ्या अम्पायरने तो नो बॉल दिला नाही. त्यावरून LSGच्या डग आऊटवर संतप्त चाहत्यांकडून काहीतरी फेकले गेले. अम्पायर त्यांच्याकडे धावले, पोलिसांनाही बोलावले गेले. चाहत्यांनी कोहली कोहली चे नारे दिले. गौतम गंभीर डग आऊटमध्ये बसला होताच आणि त्यात कोहलीच्या नारेबाजीने अजून वातावरण तापले. काही काळ सामना थांबला होता.
Web Title: IPL 2023, SRH vs LSG Live Marathi : Absolute chaos! Someone from stands threw something on LSG Dugout for not giving no ball, umpires have moved towards the LSG dugout.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.