IPL 2023, SRH vs MI Live : उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live :  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या विकेटनंतर MIच्या धावांचा ओघ आटला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:46 PM2023-04-18T20:46:58+5:302023-04-18T20:47:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Aiden Markram grabs 2 stunner catch, Marco Jansen strikes twice in an over, Ishan Kishan and Suryakumar Yadav depart in quick succession, Video | IPL 2023, SRH vs MI Live : उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video

IPL 2023, SRH vs MI Live : उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live :  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या विकेटनंतर MIच्या धावांचा ओघ आटला. इशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी चांगली भागीदारी करताना सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना प्रत्युत्तर दिले. पण, त्यांना एकेरी-दुहेरी धावेवर समाधान मानावे लागत होते. त्यामुळे इशानने धोका पत्करला अन् उत्तुंग फटका मारला... SRHचा कर्णधार एडन मार्करामने उलट्या दिशेने धाव घेत अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर सूर्यकुमार यादवचाही अविश्वसनीय झेल घेऊन मार्करामने सामना फिरवला. 

IPL 2023 मधील मोठी काँट्रोव्हर्सी? MS Dhoniच्या चुकीकडे अम्पायरचे दुर्लक्ष, जिंकला असता विराटचा RCB

भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात चेंडू चांगला वळवला, परंतु रोहितने अखेरच्या चेंडूवर पदलालित्य दाखवताना कव्हरच्या वरून चौकार खेचला. रोहितने सलग तीन चौकार खेचून वॉशिंग्टन सुंदरचं स्वागत केले आणि त्याने १४ धावा करून आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा त्याने ओलांडला. रोहित आज चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि त्याने टी नटराजनलाही चांगले फटके मारले. SRHच्या गोलंदाजांनी त्वरीत त्याच्या चेंडूत बदल केला अन् रोहित फसला. १८ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर रोहित बाद झाला. रोहितच्या विकेटनंतर मुंबईची धावगती मंदावली. कॅमेरून ग्रीन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु SRHच्या फिरकी गोलंदाजांनी त्याला जखडून ठेवले.


१८ चेंडूंनंतर मुंबईला चेंडू सीमापार पाठवण्यात यश आले. ग्रीनच्या षटकारानंतर इशाननेही आक्रमक पवित्रा पुन्हा घेतला. त्याने आयपीएलमध्ये ४०००+धावांचा टप्पा ओलांडला. मुंबईने १० षटकांत १ बाद ८० धावा केल्या. १२व्या षटकात इशानचा ( ३८) अप्रतिम झेल एडन मार्करामने टिपला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मार्करामने आणखी एक अविश्वसनीय झेल घेत सूर्यकुमार यादवला ( ७) माघारी जाण्यास भाग पाडले. मार्को यान्सेनने एका षटकात MI ला दोन मोठे धक्के दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Aiden Markram grabs 2 stunner catch, Marco Jansen strikes twice in an over, Ishan Kishan and Suryakumar Yadav depart in quick succession, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.