IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी केली. १९२ धावांचा यशस्वी बचाव करताना MI ने सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा हा सामना १४ धावांनी जिंकला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याने आज गोलंदाजीची सुरुवातही केली अन् शेवटही... नावातच तेंडुलकर असल्याने अर्जुनवर प्रचंड दडपण असणे साहजिकच होते. वडिलांनी एवढं काही केलंय आणि लहान वयातच त्याचं दडपण अर्जुनवर आलं असेल आणि त्याला आता त्याची सवय झाली असेल. याची प्रचिती आली. IPL सारख्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या लीगमध्ये शेवटचं षटक फेकणं म्हणजे डोक्याला टेंशनच... त्यात २० धावांचा बचाव म्हणजे काहीच नाही.
मुंबई इंडियन्सची विजयाची हॅटट्रिक; अर्जुन तेंडुलकरचे अप्रतिम शेवटचे षटक, घेतली विकेट
रोहित शर्माने मोठ्या विश्वासाने शेवटचे षटक अर्जुनला दिले आणि त्याने अप्रतिम यॉर्कर मारा करून हैदराबादच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. त्याने पहिले दोन चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर यॉर्कर फेकले. नंतर काही चेंडू बंध्यात म्हणजेच फलंदाजाच्या पायावर टाकले अन् पाचव्या चेंडूवर त्याने आयपीएलमधील पहिली विकेट मिळवली. त्याने भुवनेश्वर कुमारला बाद करून हैदराबादचा डाव १७८ धावांवर गुंडाळला. अर्जुनने पहिल्या सामन्यात २ षटकांत १७ धावा दिल्या आणि आज त्याने २.५ षटकांत १८ धावा देऊन एक विकेट घेतली. अर्जुनने विकेट घेताच रोहित प्रचंड खूश झाला अन् त्याने अर्जुनला मिठी मारली. तेच आपल्या मुलाची कामगिरी ड्रेसिंग रुममध्ये बसून पाहणाऱ्या सचिनचीही छाती अभिमानाने फुलली.
अर्जुन तेंडुलकर म्हणतो, माझी योजना फक्त वाइड बॉलिंग करून फलंदाजांना लांबच्या बाजूने फटके मारण्यास भाग पाडण्याची होती. मला गोलंदाजी आवडते आणि कधीही गोलंदाजी करायला मला आनंद होतो. आम्ही [सचिन आणि तो] क्रिकेटबद्दल खूप बोलतो. आम्ही डावपेच आणि योजनेबाबत बोलतो.
Web Title: IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Arjun Tendulkar defends 20 runs in the last over against Sunrisers Hyderabad, A proud moment for Sachin Tendulkar, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.