IPL 2023, SRH vs MI Live : कॅमेरून ग्रीनचा 'पैसा वसूल' खेळ! तिलक वर्माच्या सोबतीने हैदराबादचा केला 'गेम'

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा, परंतु हैदराबादचा लोकल बॉय तिलक वर्मा ( Tilak Verma) ने कॅमेरून ग्रीनसह मुंबईच्या धावांचा वेग वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:08 PM2023-04-18T21:08:21+5:302023-04-18T21:13:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Cameron Green ( 64*), Tilak Verma ( 37), Ishan kishan ( 38), Mumbai Indians set 193 runs target | IPL 2023, SRH vs MI Live : कॅमेरून ग्रीनचा 'पैसा वसूल' खेळ! तिलक वर्माच्या सोबतीने हैदराबादचा केला 'गेम'

IPL 2023, SRH vs MI Live : कॅमेरून ग्रीनचा 'पैसा वसूल' खेळ! तिलक वर्माच्या सोबतीने हैदराबादचा केला 'गेम'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : रोहित शर्माने छोटी खेळी करून मोठा विक्रम करून माघारी परतल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांत चांगला मारा केला. इशान किशन, कॅमेरून ग्रीन यांना मोठे फटके मारण्याची संधी त्यांनी दिली नाही. पण, मुंबई इंडियन्सकडून खेळणारा, परंतु हैदराबादचा लोकल बॉय तिलक वर्मा ( Tilak Verma) ने कॅमेरून ग्रीनसह मुंबईच्या धावांचा वेग वाढवला. ग्रीनने अर्धशतक झळकावताना मुंबईला मोठी धावसंख्या उभारून दिली. '

उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video


रोहित आज चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि त्याने टी नटराजनलाही चांगले फटके मारले. SRHच्या गोलंदाजांनी त्वरीत त्याच्या चेंडूत बदल केला अन् रोहित फसला. १८ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर रोहित बाद झाला. रोहितच्या विकेटनंतर मुंबईची धावगती मंदावली. कॅमेरून ग्रीन मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु SRHच्या फिरकी गोलंदाजांनी त्याला जखडून ठेवले. १८ चेंडूंनंतर मुंबईला चेंडू सीमापार पाठवण्यात यश आले. ग्रीनच्या षटकारानंतर इशाननेही आक्रमक पवित्रा पुन्हा घेतला. त्याने आयपीएलमध्ये ४०००+धावांचा टप्पा ओलांडला.  


१२व्या षटकात इशानचा ( ३८) अप्रतिम झेल एडन मार्करामने टिपला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मार्करामने आणखी एक अविश्वसनीय झेल घेत सूर्यकुमार यादवला ( ७) माघारी जाण्यास भाग पाडले. मार्को यान्सेनने एका षटकात MI ला दोन मोठे धक्के दिले. तिलक वर्मा आणि ग्रीन यांनी २८ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी करून मुंबईला पुन्हा ट्रॅकवर आणले. १७व्या षटकात भुवनेश्वर कुमारने ही भागीदारी संपुष्टात आणली. तिलक १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३७ धावांवर झेलबाद झाला.  ग्रीनने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. टी नटराजनने टाकलेल्या १८व्या षटकात ग्रीनने ४,४,४,६ अशा २० धावा कुटल्या. पण, भुवीने पुढील षटक चांगले टाकले. ग्रीन ४० चेंडूंत ६४ धावांवर नाबाद राहिला आणि मुंबईने ५ बाद १९२ धावा केल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Cameron Green ( 64*), Tilak Verma ( 37), Ishan kishan ( 38), Mumbai Indians set 193 runs target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.