Join us  

IPL 2023, SRH vs MI Live : १४ वी धाव होताच रोहित शर्माने नोंदवला IPL मधील मोठा विक्रम; आता देणार तिघांना टक्कर

SRHने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि MIचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने १४वी धाव घेत मोठा विक्रम नोंदवला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 7:47 PM

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद ( MI vs SRH) आज विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. SRHने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि MIचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने १४वी धाव घेत मोठा विक्रम नोंदवला.  

MI चा कर्णधार रोहित शर्माने हैदराबादच्या स्टेडियमवर ४६६ धावा केल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात चेंडू चांगला वळवला, परंतु रोहितने अखेरच्या चेंडूवर पदलालित्य दाखवताना कव्हरच्या वरून चौकार खेचला. मार्को यान्सेनने टाकलेला चेंडू इशान किशनने सीमारेषेबाहेर फेकला. रोहितने स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आणि षटकार खेचून वॉशिंग्टन सुंदरचं स्वागत केले.  

आज त्याने १४ धावा करून आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा त्याने ओलांडला. रोहितने आजच्या सामन्यापूर्वी २३१ सामन्यांत १ शतक व ४१ अर्धशतकांसह ५९८६ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहली ( ६८४४), शिखर धवन ( ६४७७) आणि डेव्हिड वॉर्नर ( ६१०९) यांनी ६ हजाराच्या वर धावा केल्या आहेत. 

रोहितने ४६१६ चेंडूंत ६००० धावा पूर्ण केल्या आणि सर्वात कमी चेंडूंत हा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांत तो तिसऱ्या स्थानावर आला. वॉर्रने ४२८५ चेंडू, कोहलीने ४५९५ चेंडू आणि धवनने ४७३८ चेंडूंचा सामना केला.

सनरायझर्स हैदराबाद - मयांक अग्रवाल, हेनरिच क्लासेन, राहुल त्रिपाटी, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को यान्सेन, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर  

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन, नेहाल वधेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, पीयुष चावला, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉफ 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३रोहित शर्मामुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App