IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद ( MI vs SRH) आज विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. SRH चा कर्णधार एडन मार्कराम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. SRH ने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि आज त्यांना विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ९, तर धावांचा पाठलाग करताना ८ विजय मिळवले आहेत. १६४ ही येथील सरासरी धावसंख्या आहे.
सनरायझर्सचा शतकवीर हॅरी ब्रुक याने ६६ धावा या कव्हर पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटवरून काढल्या आहेत. मुंबई इंडियन्सला याच गोष्टीवर विचार करावा लागणार आहे. आजच्या सामन्यात मार्को यान्सेन व ड्युआन यान्सेन हे जुळे भाऊ समोरासमोर येणार आहेत. MI चा कर्णधार रोहित शर्माने हैदराबादच्या स्टेडियमवर ४६६ धावा केल्या आहेत आणि आज त्याने १४ धावा केल्यास आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा तो ओलांडेल.
मागील सामन्यात MI ने अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी दिली होती आणि त्याने २ षटकांत १७ धावा दिल्या होत्या. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता. पण, आज रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करतोय. अशा परिस्थितीत रोहित कोणाला बाहेर बसवतो, याची उत्सुकता होती. मुंबईने ड्युआन यान्सेनच्या जागी आज जेसन बेहरेनडॉर्फ खेळणार आहेत. अर्जुन आज प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम आहे.
सनरायझर्स हैदराबाद - मयांक अग्रवाल, हेनरिच क्लासेन, राहुल त्रिपाटी, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को यान्सेन, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर ( Match 25. Sunrisers Hyderabad XI: M Agarwal, H Klaasen (wk), R Tripathi, H Brook, A Markram (c), A Sharma, B Kumar, M Markande, M Jansen, T Natarajan, W Sundar.)
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन, नेहाल वधेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, पीयुष चावला, अर्जुन तेंडुलकर, जेसन बेहरेनडॉफ ( MI 1 Rohit Sharma (capt.), 2 Ishan Kishan (wk), 3 Suryakumar Yadav, 4 Tilak Varma, 5 Cameron Green, 6 Nehal Wadhera, 7 Tim David, 8 Hrithik Shokeen, 9 Piyush Chawla, 10 Arjun Tendulkar, 11 Jason Behrendoff)