IPL 2023, SRH vs RR Live : वेगाचा 'राजा'! उम्रान मलिकने 149.3kmph च्या वेगाने चेंडू टाकला अन् उडाला देवदत्तचा दांडा, Video 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी आज हैदराबादचे स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 04:58 PM2023-04-02T16:58:57+5:302023-04-02T16:59:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs RR Live : A 149.3kmph cherry from Umran Malik to clean up Devdutt Padikkal, Video  | IPL 2023, SRH vs RR Live : वेगाचा 'राजा'! उम्रान मलिकने 149.3kmph च्या वेगाने चेंडू टाकला अन् उडाला देवदत्तचा दांडा, Video 

IPL 2023, SRH vs RR Live : वेगाचा 'राजा'! उम्रान मलिकने 149.3kmph च्या वेगाने चेंडू टाकला अन् उडाला देवदत्तचा दांडा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी आज हैदराबादचे स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी तडाखेबंद फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा केला आहे. राजस्थानने १६ षटकांत ३ बाद १७० धावा कुटल्या आहेत. पण, उम्रान मलिकने भन्नाट चेंडू टाकून देवदत्त पडिक्कलचा त्रिफळा उडवला.

मार, झोड फटकेबाजी! जॉस बटलरने कुटल्या १० चेंडूंत ४६ धावा, RR ने पॉवर प्लेमध्ये रचला इतिहास 

नव्याने बांधणी करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. जोस बटलर व यशस्वी जैस्वाल यांनी SRHच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून विक्रमी भागीदारी केली.  वॉशिंग्टन सुंदरच्या पहिल्याच षटकात १९ धावा चोपल्या. बटलर-यशस्वीला रोखण्यासाठी भुवी सातत्याने गोलंदाजीत बदल करताना दिसले. टी नटराजनच्या पहिल्या षटकात ४,०,४,४,४,१ अशा १७ धावा आल्या. फजहल फारूकीच्या पुढील षटकात बटलरने ३ चौकार खेचून २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, पाचव्या षटकात फारूकीने भन्नाट चेंडू टाकून बटलरच्या बेल्स उडवल्या. बटलर २२ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला अन् यशस्वीसह त्याची ८५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. 

त्यानंतर आलेल्या संजू सॅमसननेही SRHच्या गोलंदाजांच्या वेगाला योग्य दिशान देताना धावा चोपल्या. उम्रान मलिकला मारलेला अपरकट अप्रतिम होता. राजस्थानने १० षटकांत १ बाद १२२ धावा केल्या. आयपीएलमध्ये पहिल्या दहा षटकांतील ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २०२०मध्ये त्यांनी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १ बाद ११९ धावा केल्या होत्या. यशस्वीने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, तीन चेंडूनंतर आक्रमक पूल मारण्याच्या प्रयत्नात त्याने फारुकीला विकेट दिली. यशस्वी ३७ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला आणि संजूसोबतची त्याची ५४ धावांची भागीदारी संपली.  उम्रानने १५व्या षटकात देवदत्त पडिक्कलचा ( २) दांडा उडवला. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: IPL 2023, SRH vs RR Live : A 149.3kmph cherry from Umran Malik to clean up Devdutt Padikkal, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.