IPL 2023, SRH vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय; सनरायझर्स हैदराबादच्या मालकिण काव्या मारन नाराज 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ प्रमाणे यंदाही पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 07:27 PM2023-04-02T19:27:30+5:302023-04-02T19:27:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023, SRH vs RR Live : A massive 72 runs victory by Rajasthan Royals, terrific spell from Yuzvendra Chahal, took 4 wickets  | IPL 2023, SRH vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय; सनरायझर्स हैदराबादच्या मालकिण काव्या मारन नाराज 

IPL 2023, SRH vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय; सनरायझर्स हैदराबादच्या मालकिण काव्या मारन नाराज 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२ प्रमाणे यंदाही पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर SRHचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा घातकी निर्णय घेतला. RRच्या जॉस बटलर, संजू सॅमसन व यशस्वी जैस्वाल यांनी त्याचा फायदा उचलताना धावांचा डोंगर उभा केला. IPL 2023 मध्ये २००+ धावा करणारा तो पहिला संघ ठरला. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या SRHचे दोन विकेट्स घेत कंबरडे मोडले अन् त्यानंतर युझवेंद्र चहलने फिरकीवर नाचवले. RRने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. 

IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई अन् दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा

२०२०नंतर आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक १५ विकेट्स घेतलेल्या ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) आजही कमाल केली आणि पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माचा (०) त्रिफळा उडवला अन् पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला (०) झेल देण्यास भाग पाडले. जेसन होल्डरने स्लीपमध्ये अप्रतिम झेल घेतला. महागडा खेळाडू हॅरी ब्रूकने काही सुरेख फटके मारले, परंतु युझवेंद्र चहलने त्याचा (१३) त्रिफळा उडवला. जेसन होल्डने आयपीएलमध्ये ५० विकेट्सचा टप्पा गाठताना वॉशिंग्टन सुंदरला ( १) माघारी जाण्यास भाग पाडले.  


आर अश्विनने SRHची शेवटची आशा असलेल्या ग्लेन फिलिप्सला ( ८) माघारी पाठवले. मयांक अग्रवाल चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु चहलने त्याला संथ चेंडू टाकून फसवला. अग्रवाल २३ चेंडूंत २७ धावा करून बाद झाला. SRH ने अब्दुल समदला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरवले. दुसरीकडे RR ने यशस्वीच्या जागी नवदीप सैनीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आणले. हैदराबादचे सावरणे अवघडच होते आणि तसेच झाले. चहलने सामन्यातील तिसरी विकेट घेत आदील राशिदला ( १८) यष्टीचीत केले.  भुवीचा त्रिफळा उडवून चहलने आणखी एक धक्का दिला. चहलने ४ षटकांत १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बोल्टने टाकलेल्या १९व्या षटकात उम्रान मलिकने ४, ६ मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. इम्पॅक्ट खेळाडू अब्दुल समद ( ३२ ) नाबाद राहिला. हैदराबादला ८ बाद १३१ धावाच करता आल्या आणि राजस्थानने ७२ धावांनी सामना जिंकला. 

तत्पूर्वी, जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी ५.५ षटकांत ८५ धावा चोपल्या. बटलर २२ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. यशस्वी ३७ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला आणि संजू सॅमसनसोबतची ५४ धावांची भागीदारी संपली. संजू ३२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. राजस्थानने ५ बाद २०२ धावा उभ्या केल्या. SRHच्या फजलहक फारूकी व टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: IPL 2023, SRH vs RR Live : A massive 72 runs victory by Rajasthan Royals, terrific spell from Yuzvendra Chahal, took 4 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.