IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : २००+ धावा केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने गोलंदाजीतही दमदार कामगिरी करून यजमान सनरायझर्स हैदराबादला बॅकफूटवर फेकले. ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. २०२०नंतर आयपीएलमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक १७ विकेट्स घेण्याचा पराक्रम बोल्टने केला आहे आणि त्यानंतर जोफ्रा आर्चर व मुकेश चौधरी यांनी पहिल्या षटकात ५ विकेट्स घेतल्या आहेत. SRH ची अवस्था पाहून मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) हिचा चेहराही पडला. RR ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ८५ धावा केल्या होत्या. त्याउलट SRH ने २ बाद ३० धावा केल्या आहेत.
IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई, दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा
जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी ५.५ षटकांत ८५ धावा चोपल्या आणि सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले. बटलर २२ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. यशस्वी ३७ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला आणि संजू सॅमसनसोबतची ५४ धावांची भागीदारी संपली. संजू ३२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला. राजस्थानने ५ बाद २०२ धावा उभ्या केल्या. SRHच्या फजलहक फारूकी व टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. IPL 2023 मध्ये २००+ धावा करणारा RR हा पहिला संघ ठरला.
फलंदाजांनी कमाल करून दाखवल्यानंतर RRच्या गोलंदाजांनी धमाक उडवली. अनुभवी ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) पहिल्याच षटकात SRHला दोन धक्के दिले. बोल्टने तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माचा (०) त्रिफळा उडवला अन् त्यानंतर पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला (०) झेल देण्यास भाग पाडले. जेसन होल्डरने स्लीपमध्ये डाव्या बाजूला झेल घेत अप्रतिम झेल घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"