Join us  

IPL 2023 : MS Dhoni ला नीट चालताही येत नव्हतं, तरीही फॅन्सच्या आनंदासाठी तो खेळला, CSKचा इमोशनल Video

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स ही मॅच खतरनाक झाली. जिओ सिनेमावर २.२ कोटी लोकांनी ही मॅच पाहिली, तर स्टार स्पोर्ट्सवर ५.६ कोटी लोक हा सामना पाहत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 4:16 PM

Open in App

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स ही मॅच खतरनाक झाली. जिओ सिनेमावर २.२ कोटी लोकांनी ही मॅच पाहिली, तर स्टार स्पोर्ट्सवर ५.६ कोटी लोक हा सामना पाहत होते. ही रेकॉर्डब्रेकिंग आकडेवारी आहे. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) रवींद्र जडेजासोबत अखेरच्या चेंडूपर्यंत CSKच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले... संदीप शर्माने टाकलेला शेवटचा चेंडू पट्ट्यात बसला असता तर चेपॉक दणाणून निघाले असले. पण, संदीपचा यॉर्कर अचूक होता अन् धोनी षटकार मारण्यापासून चुकला. CSKचा कर्णधार म्हणून दोनशेवा सामना खेळणाऱ्या धोनीला हा विक्रम पराभवानं साजरा करावा लागला. पण, या सामन्यात फलंदाजीला येण्याच्या स्थिती धोनी नव्हता.. त्याच्या गुडघ्याला दुखापत झालीय, हे चाहत्यांना माहित होतं. तरीही त्यांच्या प्रेमापाई 'माही' मैदानावर उतरला अन् अखेरच्या चेंडूपर्यंत लढला.

कोण प्रार्थना करत होतं, कोणाच्या डोळ्यांत आलेले अश्रू! MS Dhoni साठी होती सर्व क्रेझ

जॉस बटलर ( ५२), देवदत्त पडिक्कल ( ३८), आर अश्विन ( ३०) आणि शिमरोन हेटमायर (३०*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ८ बाद १७५ धावांचा डोंगर उभा केला. आकाश सिंग, तुषार देशपांडे व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. चेपॉकच्या खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठणे अवघडच होते. डेव्हॉन कॉनवे ( ५०) व अजिंक्य रहाणे ( ३१) यांनी CSKला मजबूत स्थितीत आणले, परंतु RRच्या फिरकीपटूंनी यजमानांना बॅकफूटवर फेकले. शिवम दुबे, मोईन अली व अंबाती रायुडू एकेरी धावेत माघारी परतल्याने CSKचे टेंशन वाढले.

अखेरच्या ५ षटकांत ६३ धावांची गरज असताना धोनी मैदानावर आला. १६ व १७व्या षटकात मिळून ९ धावाच जडेजा व धोनीला करता आल्या. RRच्या फिरकीपटूंनी CSKच्या धावांचा ओघ आटवला होता. १८ चेंडूंत ५४ धावांची गरज असताना १८व्या षटकात १० धावा मिळाल्या. १२ चेंडू ४० धावा असा सामना आला अन् जडेजाने जेसन होल्डरला खणखणीत षटकार खेचून त्या षटकात १९ धावा काढल्या. ६ चेंडू २१ धावांची गरज असताना धोनी स्ट्राईकवर होता. संदीप शर्मा दडपणात होता आणि त्याने पहिले दोन चेंडू Wide फेकले. धोनीने हे दडपण हेरले अन् सलग दोन षटकार खेचले. अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना संदीपने यॉर्कर फेकला अन् धोनीला १ धावच करता आली. पण, नीट चालताही येत नसताना धोनीने अखेपर्यंत खिंड लढवली अन् CSK ने तो व्हिडीओ पोस्ट करून ही गोष्ट सांगितली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्डचेन्नई सुपर किंग्स
Open in App