Join us  

IPL 2023 : "आज मी भारतीय चाहत्यांना गप्प केलं...", 'शतकवीर' हॅरी ब्रुकने टीकाकारांना दिले प्रत्युत्तर

harry brook ipl : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकात नाईट रायडर्सचा २३ धावांनी पराभव केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 5:30 PM

Open in App

harry brook on indian fan । कोलकाता : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकात नाईट रायडर्सचा (SRH vs KKR) २३ धावांनी पराभव केला. हैदराबादकडून हॅरी ब्रूकने ५५ चेंडूत शानदार शतकी खेळी केली. शतक झळकावल्यानंतर इंग्लिश खेळाडू ब्रूकने भारतीय चाहत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर शतक होण्याआधी काही चाहते ब्रूकला सोशल मीडियावर ट्रोल करत होते. मात्र, आता शतकी खेळी करून त्याने टीकाकारांना सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, आयपीएलच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने हॅरी ब्रूकला मोठ्या किमतीत खरेदी केले होते. १३ कोटी रूपयात खरेदी करण्यात आलेल्या ब्रूकने काही सामन्यात खराब कामगिरी केली होती. खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या ब्रूकवर सातत्याने टीका होत होती. पण केकेआरविरूद्धच्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर त्याने टोलर्सला उत्तर दिले आहे. 

हैदराबादचा २३ धावांनी विजय काल झालेल्या ईडन गार्डन्सवरील सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने शतकी खेळी करून यजमान कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ब्रूकच्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २२८ धावा केल्या. २२९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा कर्णधार नितीश राणा (७५) आणि रिंकू सिंग (५८) यांनी स्फोटक खेळी केली पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अखेर हैदराबादने २३ धावांनी विजय मिळवून यजमान केकेआरचा पराभव केला.

काही दिवसांपूर्वी माझ्यावर खूप टीका झाली - ब्रूकटीकाकारांना प्रत्युत्तर देताना हॅरी ब्रूकने म्हटले, "तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि लोक तुम्हाला बकवास म्हणत असतील तर आपल्याला स्वतःवरच संशय येऊ लागतो. असे अनेक भारतीय चाहते असतील जे सध्या माझे कौतुक करत असतील, पण काही दिवसांपूर्वी ते मला खूप वाईट म्हणत होते. आता मी त्यांना गप्प केले याचा मला खूप आनंद आहे." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादट्रोलभारत
Open in App