Join us  

IPL 2023 : सनरायजर्स,पंजाबने कर्णधारांनाच दाखविला बाहेरचा रस्ता, आयपीएल संघांनी केले मोठे फेरबदल

IPL 2023:

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 6:11 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल २०२३ साठी सनरायजर्स हैदराबाद संघाने आपला कर्णधार न्यूझीलंडचा केन विलियम्सन याला तर पंजाब किंग्सने कर्णधार मयांक अग्रवाल याला चक्क बाहेरचा रस्ता दाखविला आहे. खेळाडू रिलीज आणि रिटेन करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. अनेक संघांनी काही दिग्गजांना नारळ दिला असून, काहींना संघासोबत जोडले. १४ कोटीत खरेदी करण्यात आलेल्या केन विलियम्सनने सनरायजर्ससाठी १३ सामन्यांत २१६ धावा काढल्या होत्या. पंजाब किंग्सने मयांक अग्रवालला १५ व्या पर्वात कर्णधार नेमले होते.  त्याच्या नेतृत्वात पंजाब संघ सहाव्या स्थानावर राहिला. सीएसकेने ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू आणि ख्रिस जॉर्डन यांना रिलीज केले. ब्राव्होला २०२२ च्या लिलावात ४.४० कोटी रुपयांत खरेदी केले होते.  डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आणि तळाच्या स्थानावरील फलंदाज अशी ख्याती असलेल्या ब्राव्होने यंदा लौकिकानुसार खेळ केला नव्हता. त्याने दहा सामन्यांतील सहा डावात केवळ २३ धावा केल्या आणि १६ गडी बाद केले होते. सीएसके संघ नवव्या स्थानावर राहिला होता.  ख्रिस जॉर्डनला सीएसकेने ३.६० कोटी मोजले. त्याने चार सामन्यांत केवळ दोन गडी बाद केले. अंबाती रायुडूने मागच्या पर्वात २५ च्या सरासरीने धावा केल्या. त्याच्यावर सीएसकेने ६.७५ कोटी मोजले होते. १३ सामन्यांत अंबातीने २७४ धावा केल्या. चेन्नई सुपर किंंग्सरिलीज खेळाडू : ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, ख्रिस जॉर्डन, ॲडम मिल्ने, एन. जगदीशन, सी. हरी निशांत, के. भगत वर्मा, केएम. आसिफ.रिटेन संघ : महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, एस. सेनापती, रवींद्र जडेजा, मोईन अली, मिचेल सेंटनर, ड्वेन प्रिटोरियस, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, दीपक चाहर, मुकेश चौधरी, महीश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, सीमरजीतसिंग, महिश पाथिराणा, प्रशांत सोलंकी.शिल्लक पर्स २०.४५कोटीविदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान२एकूण रिक्त स्थान ७ट्रेड खेळाडू - कोणीच नाहीमुंबई इंडियन्सरिलिज खेळाडू : कीरोन पोलार्ड, अनमोलप्रितसिंग, आर्यन जुयाल, बासिल थम्पी, डॅनियल सॅम्स, फॅबियन ॲलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरिडेथ, संजय यादव, टायमल मिल्स.रिटेन संघ : रोहित शर्मा कर्णधार, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टफ, रमणदीपसिंग, डिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, शौकिन, कार्तिकेयसिंग, बेहरनड्रॉफ, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान ,आकाश माधवल.शिल्लक पर्स २०.५५कोटीविदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान३एकूण रिक्त स्थान९ट्रेड खेळाडू - जेसन बेहरनड्रॉफकोलकाता नाइट रायडर्स रिलिज खेळाडू : पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्स, अमान खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चामिका करुणारत्ने, ॲरोन फिंच, ॲलेक्स हेल्स, अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाब इंद्रजीत, प्रथमसिंग, रमेश कुमार, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन.रिटेन संघ : श्रेयस अय्यर कर्णधार, रमानुल्लाह गुरबाज, रिंकूसिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, नीतीश राणा, अनुकूल रॉयल व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, साऊदी, फर्ग्युसन, उमेश यादव, सी.व्ही. वरुण, हर्षित राणा.शिल्लक पर्स ७.०५ कोटीविदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान३एकूण रिक्त स्थान ११ट्रेड खेळाडू - शार्दुल ठाकूर, रहमन उल्लाह गुरबाज, फर्ग्युसनदिल्ली कॅपिटल्सरिलिज खेळाडू : शार्दुल ठाकूर, टिम सीफर्ट, अश्विन हेब्बर, सिकर भरत, मनदीपसिंगरिटेन संघ : ऋषभ पंत कर्णधार, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, सर्फराजखान, यश धूल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एन्रिच नॉर्खिया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, अमान खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल.शिल्लक पर्स १९.४५ कोटी विदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान२एकूण रिक्त स्थान ५ट्रेड खेळाडू - अमान खानरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूरिलिज खेळाडू : जेसन बेहरनड्रॉफ, अनिश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनित सिसोदिया, शेफ्रान रुदरफोर्ड.रिटन संघ : फाफ डुप्लेसिस कर्णधार, विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ॲलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, आकाशदीप.शिल्लक पर्स ८.७५कोटीविदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान२एकूण रिक्त स्थान७ट्रेड खेळाडू - कोणीच नाहीराजस्थान रॉयल्सरिलिज खेळाडू : अनुनयसिंग, कॉर्बिन बोश, डॅरेल मिशेल, जिम्मी निशाम, करुण नायर, नाथन कुल्टर नाईल, रॉसी वान डेर दुसेन, शुभम गढवाल, तेजस बारोका.रिटेन संघ : संजू सॅमसन कर्णधार, यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबे मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, के. सी. करिअप्पा.शिल्लक पर्स १३.२ कोटीविदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान४एकूण रिक्त स्थान९ट्रेड खेळाडू - कोणीच नाहीगुजरात टायटन्सरिलिज खेळाडू : रहमानुल्लाह गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डोनिनिक ड्रेग्स, गुरकिरतसिंग, जेसन रॉय, वरुण ॲरोन.रिटेन संघ : हार्दिक पांड्या कर्णधार, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, राशिद खान, विजय शंकर, आर. साईकिशोर, जयंत यादव, मोहम्मद शामी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, नूर अहमद, दर्शन नळकांडे, प्रदीप सांगवान.शिल्लक पर्स १९.२५ कोटी विदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान३एकूण रिक्त स्थान७ट्रेड खेळाडू - कोणीच नाहीलखनौ सुपर जायंट्सरिलीज खेळाडू : ॲन्ड्र्यू टाय, अंकित राजपूत, दुष्मंत चामिरा, इवान लेविस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम.रिटेन संघ : लोकेश राहुल कर्णधार, आयुष बदोनी, कर्ण शर्मा, मनन वोरा, क्विंटन डिकॉक, मार्क्स स्टोयनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, कायले मायर्स, कृणाल पांड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वूड, मयंक यादव, रवी बिष्णोई.शिल्लक पर्स २३.२५ कोटी विदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान४एकूण रिक्त स्थान१०ट्रेड खेळाडू - कोणीच नाहीपंजाब किंग्सरिलिज खेळाडू : मयांक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, रितिक चॅटर्जी.रिटेन संघ : शिखर धवन कर्णधार, शाहरुख खान, जाॅनी बेयरस्टो, प्रभसिमरनसिंग, भानुका राजपक्षे, जीतेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियॉम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीपसिंग, बलतेजसिंग, नाथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार.शिल्लक पर्स ३२.२ कोटी विदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान३एकूण रिक्त स्थान९ट्रेड खेळाडू - कोणीच नाहीसनरायजर्स हैदराबादरिलिज खेळाडू : केन विल्यम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सूचिथ, प्रियम गर्ग, रवीकुमार समर्थ, रोमारियो शफर्ड्स, सौरभ दूबे, सीन एबोट, शशांकसिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद.रिटेन संघ : राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यान्सेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन, कार्तिक त्यागी, फझलहक फारुकी.शिल्लक पर्स ४२.२५ कोटी विदेशी खेळाडूंचे रिक्त स्थान४एकूण रिक्त स्थान१३ट्रेड खेळाडू - कोणीच नाही 

टॅग्स :आयपीएल २०२२केन विल्यमसनमयांक अग्रवाल
Open in App