इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या पर्वात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) खेळणार नाही, अशा चर्चा सुरू आहेत. आयपीएल २०२२मध्ये कर्णधारपद काढून घेतल्यामुळे जडेजा CSK व्यवस्थापनावर नाराज आहे आणि सोशल मीडियावरून त्याने CSK च्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे जडेजा पुढील पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या संघात खेळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यात सुरेश रैना ( Suresh Raina was seen wearing a Chennai Super Kings jersey) बुधवारी चेन्नईच्या जर्सीत दिसल्याने चाहते खुश झाले आहेत. Mr IPL रैना पुन्हा एकदा CSK कडून खेळणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
IPL 2023 Trading Window नोव्हेंबरमध्ये खुली होणार, Ravindra Jadejaसह ६ खेळाडू वेगळ्या संघात जाणार?
सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्सचा जुना खेळाडू आहे, परंतु मागील वर्षी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये CSK व्यवस्थापनाने त्याच्याकडे दुलर्क्ष केले. त्यामुळे चाहते संतापले होते. २००८ पासून CSK सोबत असलेला रैना २०१६ व २०१७मध्ये निलंबनाच्या काळात दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळला. त्याने आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत १ शतक व ३९ अर्धशतकांसह ४०४२ धावा केल्या आहेत. पण, आता जडेजाचा दुरावा लक्षात घेता सुरेश रैना त्याला रिप्लेस करेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे CSK चे फॅन्सही खुश झाले आहेत.
IPL 2023 Trading Window नोव्हेंबरमध्ये खुली होणार, Ravindra Jadejaसह ६ खेळाडू वेगळ्या संघात जाणार?
आयपीएल २०२२मध्ये कर्णधारपदावरून जे नाट्य रमलं, त्यामुळे जडेजा नाराज असल्याची चर्चा सुरू होतीच. त्यात जडेजाने सोशल मीडियावरील CSK संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या. महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या CSK च्या व्हिडीओतूनही जडेजा गायब होता. २००८मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. तेव्हा शेन वॉर्नने त्याला रॉकस्टार हे टोपण नाव दिले होते. २०१२च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सन ९.८ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि त्या लिलावातील तो महागडा खेळाडू ठरला होता. जडेजाने २१० आयपीएल सामन्यांत २५०२ धावा व १३२ विकेट्स घेतल्या आहेत.