इंडियन प्रीमिअर लीग २०२३ आता अंतिम टप्प्यात आली असताना लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात मुंबईचा लोकल बॉय सूर्या दाखल झाला आहे. मुंबईच्या गाईल्स शिल्ड स्पर्धेत वेगवान त्रिशतक झळकावणारा सूर्यांश शेडगे ( Suryansh Shedge) आयपीएलमध्ये LSGच्या ताफ्यात दाखल झाला आहे. जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट याची रिप्लेसमेंट म्हणून सूर्यांशची निवड केली गेली आहे. १३ वर्षांचा असताना सूर्यांशने गाईल्स शिल्ड स्पर्धेत गुंडेचा अकादमी ( कांदिवली) कडून खेळताना एसपीएसएस मुंबादेवी निकेतन ( बोरीवली) संघाविरुद्ध १३७ चेंडूंत ३२६ धावांची खेळी केली होती.
२० वर्षीय सूर्यांशने मागच्या वर्षी २५ वर्षांखालील स्पर्धेत ८ सामन्यांत दोन अर्धशतकं आणि १२ विकेट्स घेतल्या होत्या. जयदेवला खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी २० लाखांत सूर्यांशची संघात निवड झाली. आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी १५ गुण आहेत. CSK विरुद्ध DC आणि LSG विरुद्ध KKR या लढतीवर इतरांचे गणित अवलंबून असणार आहे.
मार्च २०१६ व एप्रिल २०१७ या कालावधीत सूर्यांशने दोन दिवसांची कसोटी, ट्वेंटी-२०, वन डे आणि ३० षटकांच्या अशा एकूण ५८ सामन्यांत ७५.६७च्या सरासरीने ३५०२ धावा केल्या होत्या. त्यात २१ अर्धशतकं व ११ शतकांचा समावेश आहे.
Web Title: IPL 2023 : Suryansh Shedge Replaces Injured Jaydev Unadkat At Lucknow Super Giants
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.