IPL 2023 RCB: टीम इंडियाच्या क्रिकेटपटूच्या करिअरवर टांगती तलवार आहे. IPL 2023च्या मोसमासोबत या खेळाडूची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते. IPL 2023 मध्ये टीम इंडियाचा हा खेळाडू आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या खेळाडूला त्याच्या खराब खेळामुळे टीम इंडियातून वगळण्यात आले आणि आता या खेळाडूचे IPL करिअर धोक्यात आले आहे. या खेळाडूला IPL 2023 मध्ये सतत संधी मिळत आहे, परंतु हा खेळाडू प्रत्येक सामन्यात आपल्या संघाच्या विश्वासास पात्र ठरताना दिसत नाही.
टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटूच्या करिअरवर टांगती तलवार
IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सतत फ्लॉप होत आहे. दिनेश कार्तिक गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. आता दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीवरही टांगती तलवार आहे. या मोसमात दिनेश कार्तिकने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने 11.86 च्या सरासरीने केवळ 83 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत दिनेश कार्तिकला येत्या सामन्यांमध्ये प्लेइंग 11 मधूनही गच्छंती होऊ शकते.
RCB कडून एका हंगामासाठी ५.५० कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिनेश कार्तिक एका मोसमासाठी ५.५० कोटी रुपये घेतो. आयपीएल 2023 मध्ये दिनेश कार्तिकने आपल्या खराब कामगिरीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बुडवण्याचे काम केले आहे. आयपीएल 2023 मध्ये दिनेश कार्तिक अद्याप एकही मोठी इनिंग खेळू शकलेला नाही. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध संघाला कठीण परिस्थितीत कार्तिकच्या चांगल्या कामगिरीची सर्वात जास्त गरज होती पण दिनेश कार्तिक 18 चेंडूत केवळ 22 धावा करून बाद झाला.
टीम इंडियाचे दरवाजेही जवळपास बंद
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा हा सामना २१ धावांनी हरला. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 237 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने 26.23 च्या सरासरीने 4459 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 20 अर्धशतके झळकली आहेत. त्याच वेळी, आयपीएल 2023 मध्ये, दिनेश कार्तिकने 8 सामन्यात केवळ 83 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकसाठी टीम इंडियाचे दरवाजेही जवळपास बंद झाले आहेत. दिनेश कार्तिक नोव्हेंबर 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा खेळताना दिसला होता, त्यानंतर तो संघाचा भाग होऊ शकला नाही.
Web Title: IPL 2023 Team India legendary cricketer career on the verge of ending as he is Flop in RCB too
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.