Join us  

IPL 2023: मुंबई आणि चेन्नईमध्ये रंगणार IPLमधील ऐतिहासिक एक हजारावा सामना, अशी असेल दोघांची प्लेईंग-११  

IPL 2023, MI Vs CSK Live Updates: आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळवले जाणाकर आहेत. त्यातील दुसरा सामना हा संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 2:38 PM

Open in App

आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळवले जाणाकर आहेत. त्यातील दुसरा सामना हा संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. हा आयपीएलमधील ऐतिहासिक सामना ठरणार आहे. कारण हा आयपीएलमधील एक हजारावा सामना असेल.

मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आठ विकेट्सनी पराभूत केले होते. आता सुमारे एक आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर ताजातवाना झालेला मुंबईचा संघ चेन्नईचे आव्हान परतवण्यासाठी उत्सुक असेल. मात्र घरच्या मैदानावर फॅन्ससमोर खेळताना मुंबई इंडियन्सवर काहीसा दबाव असेल. मात्र दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ३४ सामन्यांमध्ये मुंबईचं पारडं जड राहिलेलं आहे. मुंबईने ३४ पैकी २० सामन्यात चेन्नईला पराभूत केले आहे.

पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईविरुद्ध खेळताना चेन्नई सुपरकिंग्सच्या विजयाची आशा ही मोईन अली, मिशेल सेंटनर आणि रवींद्र जडेजा हे फिरकीपटू किती प्रभावी ठरतात यावर अवलंबून असेल. तर चेन्नईचा संघ या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज सिसंडा मगाला याला संधी देऊ शकतो. त्याला संधी दिल्यास मिशेल सेंटनर याला संघातून वगळले जाईल.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर आजच्या लढतीत अतिरिक्त दबाव असणार आहे. गेल्या हंगामात फलंदाजीमध्ये रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला होता. गेल्या सामन्यात त्याने मुंबईला वेगवान सुरुवात करून दिली होती. मात्र तो मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला होता. 

दोन्ही संघांचें अंतिम ११ खेळाडू असे असू शकतातमुंबई इंडियन्स - रोहिल शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव/जेसन बेहरनडॉर्फ (इम्पॅक्ट प्लेअर), कॅमरून ग्नीन, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, ऋतिक शौकिन, अरशद खान, कुमार कार्तिकेय/पीयूष चावला आणि जौफ्रा आर्चर. चेन्नई सुपरकिंग्स - डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, अंबाती रायुडू/तुषार देशपांडे (इम्पॅक्ट प्लेअर), रवींद्र जडेजा, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), सिसंदा मगाला/मिचेल सेंटनर, राजवर्धन हंगरगेकर आणि दीपक चहर.  

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App