बंगळुरू : रॉयल चँलेजर्स बंगळुरूविरुद्धचा हायहोल्टेज सामना चेन्नई सुपरकिंग्सने थोडक्यात जिंकला. मात्र विजयानंतरही सीएसकेच्या बेशिस्त गोलंदाजीचा वीरेंद्र सेहवागने समाचार घेतला. जर गोलंदाज असेच वाइड आणि नो बॉल टाकत राहिले तर लवकरच धोनीवर एका सामन्याची बंदी येऊ शकते. मग चेन्नईवर त्यांच्या लाडक्या कर्णधाराशिवाय खेळण्याची नामुष्की ओढवेल असे सेहवाग म्हणाला. स्लो ओव्हर रेटमुळे यंदा बऱ्याच कर्णधारांना तब्बल १२ लाखांचा दंड भोगावा लागलेला आहे. ही वेळ लवकरच धोनीवरही येऊ शकते असे सेहवागला वाटते आहे. विशेष म्हणजे धोनीने याआधीच सीएसकेच्या गोलंदाजांना बेशिस्त गोलंदाजीवरून तंबी दिली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2023 : ...तर धोनीवर बंदी येऊ शकते, वीरेंद्र सेहवागचा दावा
IPL 2023 : ...तर धोनीवर बंदी येऊ शकते, वीरेंद्र सेहवागचा दावा
IPL 2023: रॉयल चँलेजर्स बंगळुरूविरुद्धचा हायहोल्टेज सामना चेन्नई सुपरकिंग्सने थोडक्यात जिंकला. मात्र विजयानंतरही सीएसकेच्या बेशिस्त गोलंदाजीचा वीरेंद्र सेहवागने समाचार घेतला.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:22 AM