आयपीएलचा मिनी लिलाव यंदा २३ डिसेंबर २०२२ ला कोच्ची येथे होत आहे. यावेळी सर्वच संघ या पुढील दिग्गजांवर मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील.
रिलीज झालेले प्रमुख खेळाडूसीएसकेने अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो, सनरायजर्सने केन विलियम्सन या १५ कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या खेळाडूंना सोडले. पंजाब किंग्सने मयांक अग्रवालला तर शार्दुल ठाकूरला दिल्लीने बाहेरचा रस्ता दाखविला आहे. न्यूझीलंडचे स्टार जिम्मी निशाम आणि डॅरिल मिचेल यांना राजस्थानने तसेच आरसीबीने जेसन बेहरेनडॉर्फ याला रिलीज केले.शक्यता असताना रिलीज न झालेले खेळाडू - रवींद्र जडेजा, रियान पराग, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, रविचंद्रन अश्विन, पृथ्वी शॉ, सुनील नरेन, वृद्धीमान साहा.या संघाने केला नफ्याचा सौदामुंबई इंडियन्सने एकूण १३ खेळाडूंना रिलीज केले. यामध्ये किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, फॅबियन ॲलन आणि टायमल मिल्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. विशेषत: पोलार्डने निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याला फलंदाजी प्रशिक्षक करून त्याच्या अनुभवाचा फायदा घेतला.कॅमरून ग्रीन खाणार सर्वाधिक भाव - माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन सर्वांत महागडा खेळाडू ठरेल, असे भाकीत वर्तविले आहे. त्याच्या मते मयांक मार्कंडेय, पीयूष चावला आणि अमित मिश्रा हे लेगस्पिन त्रिकूटही अनेक फ्रेंचाइजींचे लक्ष वेधू शकतील.