Join us  

IPL 2023 Trading Window नोव्हेंबरमध्ये खुली होणार, Ravindra Jadejaसह ६ खेळाडू वेगळ्या संघात जाणार?, जाणून घ्या नियम

IPL 2023 Trading Window - आता आयपीएल २०२३च्या तोंडावरही मिनी ऑक्शन होणे अपेक्षित आहे आणि सुरेश रैना ( Suresh Raina) सह ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही, त्यांचे पुनरागमन शक्य आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 8:26 PM

Open in App

IPL 2023 Trading Window - इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२२च्या पर्वात गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या फ्रँचायझीच्या समावेशामुळे प्रस्थापित ८ फ्रँचायझींनं बसवलेली संघांची घडी विस्कटली आहे. त्यामुळे सर्व संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. आता आयपीएल २०२३च्या तोंडावरही मिनी ऑक्शन होणे अपेक्षित आहे आणि सुरेश रैना ( Suresh Raina) सह ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही, त्यांचे पुनरागमन शक्य आहे. पण, तत्पूर्वी होणाऱ्या आयपीएल २०२३च्या ट्रेडिंग विंडो ( एका फ्रँचायझीमधून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये खेळाडूचे जाणे) मध्येही बरेच उलटफेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा धक्कादायक बदल असेल तो रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याचा. चेन्नई सुपर किंग्ससोबतचे ( Chennai Super Kings) त्याचे संबंध फिसकटल्याची चर्चा आहे.

आयपीएल २०२२मध्ये कर्णधारपदावरून जे नाट्य रमलं, त्यामुळे जडेजा नाराज असल्याची चर्चा सुरू होतीच. त्यात जडेजाने सोशल मीडियावरील CSK संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या. महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या CSK च्या व्हिडीओतूनही जडेजा गायब होता. २००८मध्ये जडेजा राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. तेव्हा शेन वॉर्नने त्याला रॉकस्टार हे टोपण नाव दिले होते. २०१२च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सन ९.८ कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि त्या लिलावातील तो महागडा खेळाडू ठरला होता. जडेजाने २१० आयपीएल सामन्यांत २५०२ धावा व १३२ विकेट्स घेतल्या आहेत.

''डिसेंबर-जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला आम्ही ऑक्शनचा विचार करतोय. त्याआधी ट्रेड विंडो खुली केली जाईल. कदाचित ती नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला खुली होईल. ऑक्शनची तारीख काय ठरते, त्यावर ट्रेड विंडोची तारीख ठरणार आहे. यंदा मिनी ऑक्शन होईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने InsideSport.IN ला सांगितले. 

रवींद्र जडेजासह ६ नावं चर्चेत

  • रवींद्र जडेजा ( चेन्नई सुपर किंग्स)
  • टायमल मिल्स ( मुंबई इंडियन्स )  
  • अॅडम मिल्ने ( चेन्नई सुपर किंग्स)
  • मनिष पांडे ( लखनौ सुपर जायंट्स) 
  • विजय शंकर ( गुजरात टायटन्स)  
  • शाहरूख खान ( पंजाब किंग्स )

 

ट्रेडिंग विंडो म्हणजे नेमकं काय?

  • मिनी ऑक्शनपूर्वी ट्रेडिंग विंडो खुली होईल, ती जवळपास एका महिन्यासाठी खुली असेल
  • आयपीएल २०२३च्या ट्रेडिंग विंडोमध्ये तीन खेळाडूंवर ट्रेड होईल, यातून एका फ्रँचायझीतील हव्या असलेल्या खेळाडूसाठी दुसरी फ्रँचायझी उत्सुकता दाखवू शकते
  • BCCI यंदाच्या लिलावात राईट टू मॅच ( RTM) पुन्हा आणण्याच्या तयारीत आहेत. 
टॅग्स :आयपीएल २०२२रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सबीसीसीआय
Open in App