IPL 2023: आज दोन सामने! केकेआरपुढे पंजाबचे आव्हान अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

IPL 2023: कोलकाता नाइट रायडर्स(Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आज मोहालीतील आयएस ब्रिंदा स्टेडिअमवर दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:16 AM2023-04-01T10:16:41+5:302023-04-01T10:37:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2023: Two Matches Today! Punjab Kings against Kolkata Knight Riders and Lucknow Super Giants against Delhi Capitals | IPL 2023: आज दोन सामने! केकेआरपुढे पंजाबचे आव्हान अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

IPL 2023: आज दोन सामने! केकेआरपुढे पंजाबचे आव्हान अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या (IPL 2023) यंदाच्या हंगामातील दुसरा रणसंग्राम कोलकाता नाइट रायडर्स(Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आज शनिवारी (१ एप्रिल) रोजी रंगणार आहे. मोहालीतील आयएस ब्रिंदा स्टेडिअमवर दुपारी ३.३० वाजता रंगणार आहे. पंजाब किंग्स शिखर धवनच्या तर कोलकाला नाईट रायडर्स नितीश राणाच्या नेतृत्वात लढतीसाठी उतरणार आहे. तर रात्री ७.३० वाजता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धलखनौ सुपर जायंट्स संघाचा सामना होणार आहे. 

कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स

स्थळ : मोहाली, वेळ : दुपारी ३.३० पासून

पंजाब किंग्स

शिखर धवनकडे  नेतृत्व. दोन्ही संघांकडे दमदार खेळाडू. मात्र, मैदानावरील कामगिरीत मागे.
पंजाबला अद्याप जेतेपदाची प्रतीक्षा. मागच्या सत्रात संघ सहाव्या स्थानी होता.
बेयरेस्टो,  लिव्हिंगस्टोन या जखमी खेळाडूंमुळे संघ चिंतेत.
अष्टपैलू सॅम करन आणि सिकंदर रझाच्या कामगिरीकडे लक्ष.
अर्शदीप, ऋषी धवन आणि राहुल चाहर यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी.

कोलकाता नाइट रायडर्स

नितीश राणा नेतृत्व करणार. गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआर दोनदा चॅम्पियन. मागच्या सत्रात मात्र सातवे स्थान.
कोच चंद्रकांत पंडित यांची रणनीती प्रभावी ठरणार?
आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांची जबाबदारी वाढली.
डेव्हिड व्हीसे व्यंकटेश अय्यर हे अष्टपैलू असले तरी आघाडीची फलंदाजी चिंतेचा विषय.
उमेश यादव, शार्दुल ठाकूर, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती असे दमदार गोलंदाज.

दिल्लीपुढे राहुलचे नेतृत्व पणाला

दिल्ली कॅपिटल्स वि. लखनौ सुपर जायंट्स

स्थान लखनौ, वेळ : सायंकाळी ७.३० पासून

दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडे नेतृत्व.
कोच रिकी पाँटिंग यांना मिचेल मार्शकडून सर्वाधिक अपेक्षा.
पृथ्वी शॉ, सरफराज खान, यश धूल, अक्षर पटेल यांच्याकडून धावांची अपेक्षा.
गोलंदाजीत अक्षर आणि कुलदीप यादव यांची आठ षटके निर्णायक ठरतील. वेगवान मारा मात्र काहीसा बोथट.

लखनौ सुपर जायंट्स

मागच्यावर्षी प्ले ऑफ खेळणाऱ्या लखनौला राहुलकडून दमदार कामगिरी अपेक्षित.
घरच्या मैदानावर राहुल, काइल मायर्स, दीपक हुड्डा यांच्याकडून मोठी खेळी होणार?
आवेश खान, जयदेव उनाडकट, कुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, प्रेरक मांकड, मार्कस स्टोइनिस, डेनियल सॅम्स, मायर्स और रोमारियो शेफर्ड यांच्यावर अष्टपैलू खेळाची जबाबदारी.
रवी बिश्नोई आणि अनुभवी अमित मिश्रा यांच्यावर फिरकीची भिस्त.

 

Web Title: IPL 2023: Two Matches Today! Punjab Kings against Kolkata Knight Riders and Lucknow Super Giants against Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.